Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या हत्येचा तपास अन् थरार; ६ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली 'ही' सीरिज 'OTT'वर ट्रेंडिगमध्ये, पाहून चक्रावेल डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:41 IST

महिलेच्या हत्येचा तपास अन्; ही क्राईम-थ्रिलर सीरिज 'OTT' वर करतेय ट्रेंड, तुम्ही पाहिलीत?

Webseries: ओटीटीवर दर महिन्याला वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज रिलीज होत असतात. त्यामुळे दर आठवड्याला कोणत्या नवीन सीरीज प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेण्या प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असते. त्यात हल्ली ओटीटी प्रेमींमध्ये थ्रिलर, रहस्यमय, हॉरर अशा जॉनरच्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु असते. सध्या नेटफ्लिक्सवर अशीच एक सीरीज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, या सीरिजचं नाव कोहरा सीझन-२ आहे. ओटीटीवर या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे. अलिकडेच ११ फेब्रुवारीला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रदर्शित होताच ही सीरीज ओटीटीवर ट्रेंड करते आहे. पहिल्याच दिवशी कोहरा-२ ने टॉप लिस्टमध्ये आपलं स्थान पक्कं केलं. मोना सिंग आणि वरुण सोबती या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. 

असं आहे कथानक...

कोहरा सीझन २ मध्ये पंजाबमधील एका गावाची कथा दाखवण्यात आली आहे. गावात एका विवाहित एनआरआय महिलेची हत्या होते,ज्याचा संशय तिच्या पती, भाऊ आणि प्रियकरावर येतो. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी  एस आय धनवंत कौर म्हणजेच मोना सिंगवर येते. 

पोलिस तपासात अनेक गुपिते उलगडत असताना सस्पेन्स अधिकच वाढतो.या सीरिजचं मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा थरारक क्लायमॅक्स. कोहरा सीझन २ चा प्रत्येक सीन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. सध्या ओटीटीवर ही सीरिज ट्रेंडिंगमध्ये आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Murder mystery 'Kohraa 2' trends on OTT, gripping viewers.

Web Summary : Netflix's 'Kohraa 2', a thriller about an NRI woman's murder in Punjab, is trending. The investigation, led by SI Dhanwant Kaur, uncovers secrets, intensifying suspense. Its thrilling climax keeps viewers hooked.
टॅग्स :मोना सिंगवेबसीरिज