Join us

बॉम्बे जनरल हॉस्पिटलमधील कर्मचारी लागले पुन्हा कामाला!, पाहा 'मुंबई डायरीज २'चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 14:32 IST

Mumbai Diaries 2 : मुंबई डायरीज या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच त्याचा दुसरा सीझन भेटीला येत आहे.

मुंबई डायरीज (Mumbai Diaries 2) या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच त्याचा दुसरा सीझन भेटीला येत आहे. दरम्यान आता सर्वाधिक प्रतिक्षित मेडिकल ड्रामाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी आता नवीन आव्हानांना तोंड देणार आहेत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. 

दुसरा सीझन थरारक असेल याचा प्रत्यय ट्रेलरवरून मिळतो आहे. मुंबई शहराला बुडवून टाकू शकेल अशा विध्वंसक पुराच्या विषयामुळे कथेचा थरार वाढला आहे. बॉम्बे जनरल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून शहर वाचवण्यासाठी काम करण्याची गरज भासत आहे. त्यातील काही समस्या त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या, त्यांचे नातेसंबंध आणि भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यांना भूतकाळातील गोष्टींशी आणि वर्तमान परिस्थितीशी झगडून तरावे लागणार आहे आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावाले लागणार आहे.

मोहित रैना म्हणाला की, मुंबई डायरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल मी अत्यंत उत्साही आहे. हा प्रवास आतापर्यंत लक्षणीय राहिला आहे आणि ह्या सीझनमध्ये प्रेक्षकांना डॉ. कौशिकची दुसरी बाजू बघायला मिळेल असे मला वाटते. पहिल्या सीझनमध्ये आमच्या व्यक्तिरेखांचा व रुग्णालयाच्या आयामाचा पाया घातला गेला आणि आता दुसऱ्या सीझनमध्ये आम्ही आमच्या व्यक्तिरेखांच्या व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यांमध्ये अधिक खोलवर जाणार आहोत.

पुढील अध्याय सर्वांपुढे आणण्यास उत्सुक - कोंकणा सेन शर्मा“पुन्हा एकदा मुंबई डायरीजच्या सेटवर काम करणे माझ्यासाठी घरी परत येण्यासारखे आहे. चित्रा ही माझी व्यक्तिरेखा ह्या सीझनमध्ये लक्षणीय बदलातून जाते हे माझ्यासाठी रोमांचक आहे. कारण, तिचा सामना तिच्या भूतकाळाशी होतो. पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले, जी प्रशंसा केली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि पुढील अध्याय सर्वांपुढे आणण्यास उत्सुक आहे,” असे कोंकणा सेन शर्मा म्हणाली.

६ ऑक्टोबरला 'मुंबई डायरीज २' प्रेक्षकांच्या भेटीलानिखिल अडवानी क्रिएशन आणि दिग्दर्शन असलेल्या या मेडिकल ड्रामाची निर्मिती मोनिषा अडवानी आणि मधु भोजवानी यांच्या एमे एण्टरटेन्मेंटने केली आहे. कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी हे कलाकार सीझन २ मध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. परमब्रत चट्टोपाध्याय आणि रिद्धी डोग्रा हे कलावंत नव्याने सहभागी झाले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी मुंबई डायरीज २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे