Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी घाबरलो होतो...", 'आश्रम ३'मध्ये इंटिमेट सीन्स शूट करताना अशी झालेली बॉबी देओलची अवस्था, पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:22 IST

'आश्रम ३'मध्ये बॉबी देओलने ईशा गुप्तासोबत दिलेल्या इंटिमेट सीनची प्रचंड चर्चा रंगली होती. आता पहिल्यांदाच याबाबत त्याने भाष्य केलं आहे. 

'आश्रम' ही ओटीटीवरील सर्वाधिक गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक. यामध्ये बॉबी देओलने बाबा निराला ही भूमिका साकारली आहे. 'आश्रम' वेब सीरिजचे आत्तापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'आश्रम ३'मध्ये बॉबी देओलनेईशा गुप्तासोबत दिलेल्या इंटिमेट सीनची प्रचंड चर्चा रंगली होती. आता पहिल्यांदाच याबाबत त्याने भाष्य केलं आहे. 

ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन्स शूट करताना नर्व्हस झालो, घाबरलो होतो. मला घाम फुटला होता, अशी प्रतिक्रिया बॉबी देओलने स्पॉटबॉयशी बोलताना दिली. इंटिमेट सीन करणं त्याच्यासाठी कठीण होतं असा खुलासाही बॉबी देओलने या मुलाखतीत केला. तो म्हणाला, "ईशा एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळते. जेव्हा आम्ही इंटिमेट सीनचं शूटिंग करत होतो तेव्हा खूप नर्व्हस होतो. पण ईशाने मला कंमर्टेबल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मी चांगल्या प्रकारे माझे सीन्स देऊ शकलो. मला वाटतं म्हणूनच लोकांनाही ते सीन्स आवडले". 

'आश्रम' वेब सीरिजमध्ये बॉबी देओल, त्रिधा चौधरी, अदिती पोहणकर, चंदन रॉय, अनुरिता झा, ईशा गुप्ता अशी स्टारकास्ट आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०२० मध्ये आला होता. आता प्रेक्षकांना पुढच्या सीझनची प्रतीक्षा आहे. 'आश्रम'मध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डेदेखील झळकली आहे. 

टॅग्स :बॉबी देओलसेलिब्रिटीईशा गुप्ता