Join us

हॉरर सिनेमा असूनही घाबरण्याऐवजी पोट धरून हसाल! ओटीटीवर मिळतेय सर्वाधिक पसंती, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:49 IST

हॉरर सिनेमा असूनही घाबरण्याऐवजी पोट धरून हसाल! ओटीटीवर मिळतेय सर्वाधिक पसंती, तुम्ही पाहिलात का?

OTT Movie: मनोरंजनाच्या विश्वात दिवसेंदिवस नवनवीन बदल घडताना दिसत आहेत. ओटीटीमुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या चित्रपट पाहणं सहज शक्य झालं आहे. अलिकडच्या काळात या माध्यमाकडे प्रेक्षकांचा कल वाढत चालला आहे.अॅक्शनपट ,रोम-कॉम चित्रपटांह हॉरर चित्रपटांनाही रसिकांची तितकीच पसंती मिळताना दिसतेय. अशाच एका हॉरर कॉमेडी सिनेमाची सध्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर चर्चा आहे. याचं कारणं म्हणजे नावाला हॉरर सिनेमा असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना घाबरण्याऐवजी खळखळून हसायला भाग पाडतो. या चित्रपटाचं नाव काकुडा आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला काकुडा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने दुहेरी भूमिका वठवली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या सिनेमाला हॉरर सीन्ससह विनोदाची झालर पाहायला मिळते. हा सिनेमा हॉरर असला तरी प्रेक्षकांना बऱ्याचदा हसवतो. त्यामुळे या चित्रपटाला आता ओटीटीवर सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे. 

अशी आहे काकुडाची कथा...

काकुडा चित्रपटामध्ये रतौडी नावाच्या एका गावाची कथा दाखवण्यात आली आहे. या गावामध्ये एका घराला दोन दरावाजे असण्याची ५० वर्षांची परंपरा असते. घरातील पहिला दरवाजा हा ये-जा करण्यासाठी लोक वापरतात तर दुसरा दरवाजा हा प्रत्येक आठवड्याला मंगळवारी उघडून ठेवावा लागतो. ज्या घराचा दरवाजा बंद असेल त्यांना काकुडाचा तडाखा बसतो. त्यानंतर त्या घरातील माणसाच्या पाठीवर कुबड बाहेर येतं आणि १३ दिवसांतच त्याचा मृत्यू होतो. 

हा चित्रपट १२ जुलै २०२४ रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला. सुरुवातीला तो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर OTT मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिलीजनंतर, हा चित्रपट काही काळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत राहिला. आयएमडीबीवर 'काकुडा' चित्रपटाला  ५.४ रेटिंग मिळालं आहे. 

टॅग्स :रितेश अगरवालसोनाक्षी सिन्हाबॉलिवूडसिनेमावेबसीरिज