Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आश्रम' फेम त्रिधा चौधरी अडकणार विवाहबंधनात, सिनेइंडस्ट्रीतील व्यक्तीला करतेय डेट, खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 18:40 IST

त्रिधाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीतील व्यक्तीला डेट करत असल्याचा खुलासाही तिने केला.

'आश्रम' या लोकप्रिय वेब सीरिजमधून अभिनेत्री त्रिधा चौधरी घराघरात पोहोचली. या वेब सीरिजमध्ये तिने बबिता हे पात्र साकारलं आहे. 'आश्रम'मधील बबिता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या भूमिकेसाठी तिचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. त्यामुळे तिच्या चाहत्या वर्गातही भर पडली होती. आता पुन्हा त्रिधा चर्चेत आली आहे. त्रिधाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. 

'कोलकाता टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्रिधाने लग्न करणार असल्याचं सांगितलं. "मी याच इंडस्ट्रीतील मुलाला डेट करत आहे. पण, आम्ही दोघांनीही कुठेही याची वाच्यता केलेली नाही. आम्ही या गोष्टी प्रायव्हेट ठेवल्या आहेत. माझ्या रिलेशनशिपबद्दल मी सध्या जास्त बोलू शकत नाही. पण, आम्ही दोघेही एकमेकांबरोबर आनंदी आहोत. आणि पुढच्या वर्षी आम्ही लग्नबंधनात अडकणार आहोत," असं त्रिधा म्हणाली. 

त्रिधाच्या या वक्तव्यानंतर आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. ती व्यक्ती कोण असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्रिधा बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. बंगाली आणि तेलुगु चित्रपटांत तिने काम केलं आहे. याबरोबरच 'स्पॉटलाइट', 'बंदिश बँडिट्स' या वेब सीरिजमध्येही ती झळकली. लवकरच बंगाली सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमा