Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सूबेदार'चं टीम इंडियासाठी खास ‘लल्ला अँथम' गाणं, अनिल कपूरसोबत झळकला क्रिकेटर हरभजन सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 16:53 IST

संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून उत्साह आणखी वाढवला आहे. 

अनिल कपूर त्याच्या आगामी ‘सूबेदार' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील ‘लल्ला’ या गाण्यावर आधारित ‘लल्ला अँथम –अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ हे विशेष गाणं भारतीय क्रिकेट टीमसाठी प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहदेखील झळकला आहे. संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून उत्साह आणखी वाढवला आहे. 

हे गाणे रोहन-विनायक यांनी संगीतबद्ध केले असून गीतकार ऋषी उपाध्याय आहेत. तर प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे सादर केले आहे. ‘लल्ला अँथम –अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ गाण्यात अनिल कपूर, राधिका मदन, हरभजन सिंह आणि शेफाली बग्गा झळकले आहेत. या म्युझिक व्हिडिओत स्टेडियममधील उत्साह आणि सिनेमॅटिक तीव्रतेचा सुरेख मिलाफ दिसतो. हरभजन सिंह यांच्यासह अनिल कपूर आणि राधिका मदान झळकतात. ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांच्या उपस्थितीमुळे गाण्यात आत्मविश्वास, स्वॅग आणि अभिमानाची झलक दिसते. 'आपल्या जागी ठाम रहा आणि कधीही मागे हटू नका’ हा चित्रपटाचा संदेशही या गाण्यातून ठळकपणे मांडला आहे.

अनिल कपूर म्हणाला, “‘सूबेदार’ ही एका अशा व्यक्तीची कथा आहे ज्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आणि अंतर्मनातील ज्वाळा यांतून शक्ती आणि ध्येय मिळते. ‘लल्ला अँथम’ त्या ज्वाळेचे प्रतिबिंब आहे. सूबेदार अर्जुन मौर्य शांत आणि संयमी असला तरी योग्य वेळी ठामपणे उभा राहतो. या गाण्याचे शूटिंग करताना सेटवरील ऊर्जा अप्रतिम होती. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सूबेदारच्या टीमकडून हा एक छोटासा प्रयत्न आहे.”

हरभजन सिंह म्हणाला, “‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’चा भाग होणे हा खरोखरच खास अनुभव होता. अनिल कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एका संस्थेसोबत काम करण्यासारखे आहे. त्यांची ऊर्जा आणि करिष्मा प्रत्येकाला प्रेरणा देतो. या गाण्याची बीट अत्यंत दमदार आहे आणि क्रिकेटच्या सध्याच्या उत्साहाशी पूर्णपणे सुसंगत आहे. टीम इंडिया आणि टीम सूबेदारला माझ्याकडून शुभेच्छा.”

‘सूबेदार’ ही कथा भारताच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून अर्जुन मौर्य (अनिल कपूर) या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखवते. तो शिस्त, अभिमान आणि अढळ नैतिक मूल्यांवर जगणारा व्यक्ती आहे. ‘सूबेदार’चे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहता येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Kapoor & Harbhajan Singh Unite for ‘Soobedaar’ Anthem for India

Web Summary : Anil Kapoor's 'Soobedaar' releases 'Lalla Anthem' for Team India, featuring Harbhajan Singh. The song, composed by Rohan-Vinayak, aims to boost morale. Kapoor highlights the film's message of resilience and duty. The movie releases on Prime Video March 5th.
टॅग्स :अनिल कपूरहरभजन सिंग