Join us
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या पत्नीसोबत बेडरूम सीन शूट करण्याआधी अभिनेत्याला फुटला होता घाम, म्हणाला - "मी तुझ्यासोबत हे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 14:41 IST

Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज २ जर पाहिली असेल तर त्यात अमृता सुभाषने बोल्ड भूमिका केली आहे. त्यात तिने बेडरूममधील इंटिमेट सीन्स दिले आहेत.

सध्या ओटीटीवर सिनेरसिकांसाठी वेबसीरिज आणि सिनेमांची मेजवानी आहे. एकानंतर एक नवनवीन सीरिज आणि चित्रपट रिलीज होत आहेत. मात्र सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली बहुप्रतिक्षीत वेबसीरिज लस्ट स्टोरीज २ (Lust Stories 2) चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये तमन्ना भाटिया, काजोल, मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि नीना गुप्ता प्रमुख भूमिकेत आहे. वेबस्टोरीजच्या कथेसोबत त्यातील सीन्स खूप चर्चेत आले होते.

लस्ट स्टोरीज २ जर पाहिली असेल तर त्यात अमृता सुभाषने बोल्ड भूमिका केली आहे. त्यात तिने बेडरूममधील इंटिमेट सीन्स दिले आहेत. नुकतेच अभिनेत्री अमृता सुभाष नेटफ्लिक्स अॅक्टर्स राउंडटेबलचा हिस्सा होती. जिथे तिने या सीरिजमधील इंटिमेट सीनबद्दल सांगितले. तिने सांगितले की, लस्ट स्टोरीज २मधील इंटिमेट सीन तिच्यासाठी आणि तिच्या सहकलाकारासाठी कठीण होते.

'लस्ट स्टोरीज २'ची कथा 'लस्ट स्टोरीज २'मध्ये अमृता सुभाषने तिचा को-स्टार आणि रिअल लाइफ बेस्ट फ्रेंड श्रीकांत यादवसोबत बेडरूमचे सीन दिले आहेत. यामध्ये ती मोलकरणीच्या भूमिकेत आहे. यात अमृता तिच्या घरमालकाच्या (तिलोत्तमा) अनुपस्थितीत तिच्या बेडरुममध्ये नवऱ्यासोबत जवळीक साधते. एके दिवशी ती पकडली जाते आणि इथून कथेत मोठा ट्विस्ट येतो.

जेव्हा स्क्रिप्ट वाचून दोन्ही स्टार्स घाबरलेनेटफ्लिक्स अ‍ॅक्टर्स राऊंड टेबलवरील चर्चेदरम्यान, अमृताने शेअर केले की तिला तिचा सहकलाकार आणि वास्तविक जीवनातील सर्वात चांगला मित्र श्रीकांत यादवसोबत काही इंटिमेट सीन शूट करायची आहेत. मी स्क्रिप्ट्स वाचल्या आणि मी घाबरले. कारण मला हे सर्व माझ्या मित्रांसोबत करावे लागले. त्यासाठी मी ‘कोको’ अर्थात कोंकणा सेनकडे थोडा वेळ मागितला. श्रीकांतलाही हे सीन करणे कंफर्टेबल वाटत नव्हते.

पतीने सहकलाकाराला इंटिमेट सीनसाठी मनवलेअमृताने पुढे सांगितले की, जेव्हा मी श्रीकांतला भेटले तेव्हा तो मला म्हणाला, मी तुझ्यासोबत हे सर्व करू शकत नाही. तिने सांगितले की फक्त मीच नाही तर माझा नवरा देखील श्रीकांतचा चांगला मित्र आहे. तो अभिनेताही आहे. माझ्या नवऱ्याने आम्हा दोघांना हे सीन करायला मनवले. तो घाबरतच श्रीकांतला म्हणाला, 'तू करशील मित्रा... चांगलं करशील.'

वर्कफ्रंट...लस्ट स्टोरीज २मधील अमृताच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. अमृताने सोशल मीडियावर श्रीकांतचे अनेक फोटो शेअर केले होते आणि लिहिले होते की, 'लस्ट स्टोरीज २'मध्ये माझ्या पतीची भूमिका कोणी साकारली आहे असे मला बरेच मेसेज आले आहेत. माझा जुना मित्र श्रीकांत यादवची या भूमिकेसाठी खूप प्रशंसा होत आहे याचा आनंद आहे. अभिनेत्रीने देव, रमन राघव २.०, गली बॉयमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. 

टॅग्स :अमृता सुभाषलस्ट स्टोरीज