अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने २०२६ साठी १५० हून अधिक नव्या वेबसीरिज आणि शोची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापैकी बहुचर्चित शो म्हणजे ‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’. नसिरुद्दीन शाह आणि जिम सरभ अभिनीत ही वेबसीरिज गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. याशिवाय नाना पाटेकर, संजय कपूर, नीरज काबी आणि मोहम्मद झीशान अयूब यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘संकल्प’ ही मनोरंजक सामाजिक-राजकीय थ्रीलर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
न्याय, सूडबुद्धी आणि थरार यावर आधारीत ‘अब होगा हिसाब’ वेबसीरिजमध्ये साहीर शेख, मौनी रॉय आणि संजय कपूर झळकणार आहेत. तसेच अमोल पराशर अभिनीत ‘द ब्युरोक्रॅट’ सीरिजमध्ये प्रशासकीय नाट्य पाहता येईल. साकिब सलीमची भूमिका असलेली ‘कप्तान’, सनी हिंदुजाची ‘विमल खन्ना’, दिव्येंदु शर्मा आणि भुवन अरोरा अभिनीत कॉप ड्रामा ‘वेटिंग है’ सोबतच रवी किशन, अमेय वाघ आणि विशाल जेठवा यांची भूमिका असलेला ‘क्लीन अप क्रू’ या क्राइम ड्रामाची चर्चा आहे. या कलाकृती अॅमेझॉन एमएक्स प्लेअरची व्याप्ती वाढवतील आणि प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट कथानक घेऊन येतील.
यासोबत अॅमेझॉन एमएक्स प्लेयर अनेक यशस्वी फ्रँचायझींचा नवीन सीझनसह घेऊन येणार आहेत. ज्यात रक्तांचल सीझन 3, सोबतच तरुणाईच्या पसंतीच्या कॅम्पस बीट्स सीझन 6, कॅम्पस डायरीज सीझन 2, हार्टबीट्स सीझन 2 आणि हू इज युअर गायनॅक सीझन 2 चा समावेश आहे. एकूणच प्राईम व्हिडीओ एम एक्स प्लेअरच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मोफत मेजवानी मिळणार आहे यात शंकाच नाही. सर्वांना या वेबसीरिज पाहण्याची उत्सुकता आहे.
Web Summary : Amazon MX Player announced over 150 new web series for 2026, including 'Made in India: The Titan Story' starring Naseeruddin Shah. 'Sankalp,' featuring Nana Patekar, and thrillers like 'Ab Hoga Hisab' are also anticipated. New seasons of popular series are coming too.
Web Summary : अमेज़ॅन एमएक्स प्लेयर ने 2026 के लिए 150 से अधिक नई वेब सीरीज की घोषणा की, जिसमें नसीरुद्दीन शाह अभिनीत 'मेड इन इंडिया: द टाइटन स्टोरी' शामिल है। नाना पाटेकर अभिनीत 'संकल्प' और 'अब होगा हिसाब' जैसे थ्रिलर भी प्रतीक्षित हैं। लोकप्रिय सीरीज के नए सीजन भी आ रहे हैं।