मनोरंजनविश्वात काम करताना अनेक कलाकारांना बोल्ड सीन, इंटिमेट सीन द्यावे लागतात. ओटीटी, वेबसीरिजमुळे तर हे प्रमाण खूपच वाढलं आहे. हे सीन करताना अनेकांना अनकंफर्टेबलही वाटतं. नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने खुलासा करत सांगितले की तिने पहिल्याच वेबसीरिजमध्ये एकाच वेळी दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला होता. हा सीन करण्याआधी नक्की काय घडलं यावर तिने नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं.
अडल्ट वेबसीरिजमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आहे तन्वी पाटील (Tanvi Patil). तिने अनेक वेबसीरिजमध्ये बोल्ड भूमिका केल्या आहेत. या भूमिका करताना आलेला अनुभव तिने नुकताच सांगितला. 'मुक्काम पोस्ट मनोरंजन'युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तन्वी म्हणाली, "मी माझ्या पहिल्याच वेबसीरिजमध्ये टॉपलेस सीन दिला होता. दोन पुरुष आणि मी असा आमच्यात लव्हमेकिंग सीन होता. माझ्या संपूर्ण आर्टिस्ट करिअरमधला तो पहिला लव्हमेकिंग सीन होता. त्यामुळे मुळात पहिल्याच सीनमध्ये थेट लव्हमेकिंग सीन करणं हेच माझ्यासाठी कठीण होतं. एकाच अभिनेत्यासोबत असलं असतं तरी ठीक होतं. पण नशिबाने माझे सहकलाकार खूप चांगले होते. त्यांनी समजून घेतलं. आम्ही आधी बसून चर्चा केली. कोण कशात कंफर्टेबल आहे हे जाणून घेतलं."
ती पुढे म्हणाली, "फक्त अभिनेत्रींनाच हे सीन्स करताना अनकंफर्टेबल वाटतं असं अजिबात नाही. अभिनेत्यांना सुद्धा तितकंच अनकंफर्टेबल वाटतं. मी नेहमी सहकलाकारांशी बसून आधी बोलते. तिथेच तुम्ही एकमेकांशी बोलून एकमेकांची परवानगी घेतली पाहिजे. मगच तुम्ही कंफर्टेबल होता आणि सीन करु शकता. कारण सीनमध्ये सहकलाकार माझ्यासोबत जे करतोय ते मला आवडत नाहीये हे माझ्या चेहऱ्यावर दिसणार, बॉडी लँग्वेजमध्ये दिसणार. यामुळे सीन खराब होणार. शेवटी माझंच काम खराब होणार. लोकं माझे सीरिज बघतात. मला वाईट दिसायचं नाहीये. जर तो हॉट सीन आहे तर तो तसाच दिसला पाहिजे. करायचं म्हणून केलं असं ते नको."