Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! एवढा ट्रान्सपरन्ट ड्रेस घालून फसली जान्हवी कपूर, युजर्सनी दिल्या अशा कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 10:50 IST

रात्री उशीरा बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अंशुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले. पण हे काय, जान्हवीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ठळक मुद्देयाआधीही जान्हवी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे ट्राले झाली आहे.

काल रात्री अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा बर्थ डे साजरा झाला. रात्री उशीरा बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अंशुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले. पण हे काय, जान्हवीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. होय, बहीणीच्या वाढदिवसाला जान्हवी ट्रान्सपरन्ट ड्रेस घालून पोहोचली. खरे तर ट्रान्सपरन्ट ड्रेस घालून मिरवणे अभिनेत्रींसाठी नवे नाही. मध्यंतरी हा ट्रेंड बराच पॉप्युलर होता. पण फॅमिली फंक्शनमध्येही जान्हवीने इतका पारदर्शक ड्रेस घातलेला पाहून इंटरनेट युजर्सनी तिला फैलावर घेतले.यावेळी जान्हवीने पर्पल कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता. तिचे पापा बोनी कपूर आणि बहीण खुशी तिच्यासोबत होते. तिचा ड्रेस इतका पारदर्शक होता की, जान्हवी यामुळे ट्रोल झाली.

किमान फॅमिली फंक्शनमध्ये तरी साधे कपडे घालावेत ना. असे वाटतेय, जणू जान्हवी कुण्या बीच पार्टीला जातेय, अशी प्रतिक्रिया एका युजरने तिचा हा ड्रेस पाहिल्यानंतर दिली. जान्हवी कपूरला हे काय झाले. तिच्याकडे दुसरे कुठले कपडे नव्हते काय? अशा शब्दात एका युजरने तिला ट्रोल केले.

याआधीही जान्हवी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे ट्राले झाली आहे. विशेष म्हणजे, जान्हवी ट्रोल झाली त्या त्या वेळी तिचा भाऊ अर्जुन कपूर तिची पाठराखण करताना दिसला आहे. मध्यंतरी जान्हवीला ट्रोल करणा-यांना अर्जुनने चांगलेच फटकारले होते. जान्हवीच्या तोकड्या कपड्यांवर बातमी करणाºया एका मीडिया हाऊसलाही त्याने धारेवर धरले होते. ‘तुमची नजर अशा गोष्टी शोधत असेल तर तुम्हाला लाज वाटायला हवी. देशात मुलींकडे कशा नजरेतून पाहिले जाते, याचे हे उदाहरण आहे,‘ असे ट्विट त्याने केले होते.

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे दोघेही जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींना फुलासारखे जपतांना दिसताहेत. एकेकाळी अर्जुन व अंशुला जान्हवी व खुशीचे नावही ऐकणे पसंत करायचे नाहीत. पण श्रीदेवींच्या निधनानंतर दोघेही जान्हवी व खुशीच्या कधी नव्हे इतक्या जवळ आले आहेत. आपल्या सावत्र बहिणींना आणि वडिलांना आपली गरज आहे, याची जाणीव अर्जुनला झाली आहे आणि अशास्थितीत अर्जुन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूर