Join us

Video : व्वा, मिस्टर कपूर तुम्ही तर कमाल केलीत...! मीरा राजपूतने केले नवरोबाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 11:52 IST

Watch Video : शाहिदने असे काय केले, तर भल्याभल्यांना जमत नाही, असे ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी’ चॅलेंज एका झटक्यात पूर्ण केले.

ठळक मुद्देशाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘कबीर सिंग’ या सुपरहिट सिनेमानंतर तो ‘जर्सी’ या सिनेमात दिसणार आहे.

शाहिद कपूरमीरा राजपूत म्हणजे बॉलिवूडचे बेस्ट कपल. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग. दोघांचेही एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. पण सध्या तरी मीरा नव्याने शाहिदच्या प्रेमात पडलीये. कारणही तसेच आहे. मीराने चॅलेंज दिले आणि शाहिदने अगदी सहज ते पूर्ण केले. मग बायको खूश्श होणारच. मीराही नव-यावर खुश्श आहे. तिने नवरोबाचे भरभरून कौतुक केलेय.तर शाहिदने असे काय केले, तर भल्याभल्यांना जमत नाही, असे ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी’ चॅलेंज एका झटक्यात पूर्ण केले. होय, सध्या या चॅलेंजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी हे चॅलेंज पूर्ण करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. आता त्यात मीरा व शाहिदच्या नावाचीही भर पडली आहे.

मीराने शाहिदला हे चॅलेंज दिले. नवरोबा हे चॅलेंज पूर्ण करू शकणार नाहीत, असे तिला वाटले होते. पण शाहिदने तिचा हा अंदाज खोटा ठरवला. मग काय, मीरा मिस्टर कपूरच्या अक्षरश: प्रेमातच पडली. ‘चॅलेंज स्वीकारण्यासाठी कायम सज्ज. मिस्टर कपूर, तुम्हाला हे सहज जमलंय, कमाल आहे...,’ अशा शब्दांत तिने शाहिदचे कौतुक केले आहे. सोबत चॅलेंज पूर्ण करतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळतेय. 17 तासांत 10 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘कबीर सिंग’ या सुपरहिट सिनेमानंतर तो ‘जर्सी’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा याच नावाच्या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. यात शाहिद कपूर एका क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूर