Join us
Daily Top 2Weekly Top 5

Watch Video : हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी Good New, ‘क्रिश 4’ची घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 13:42 IST

हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय,‘क्रिश 4’ची घोषणा झालीय. आज ‘क्रिश 3’ला पाच वर्षे झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर खुद्द हृतिकने ‘क्रिश 4’ची घोषणा केली.

हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय,‘क्रिश 4’ची घोषणा झालीय.  ‘क्रिश 3’ला पाच वर्षे झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर खुद्द हृतिकने ‘क्रिश 4’ची घोषणा केली. हृतिक रोशनची ‘क्रिश’ फ्रेन्चाइजी बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरहिरो सीरिज आहे. या फ्रेन्चाईजीच्या तिन्ही भागांनी बॉक्सआॅफिसवर धूम केली. या सीरिजमुळे हृतिक बच्चेकंपनीत कमालीचा लोकप्रीय झाला. सध्या हृतिक ‘सुपर 30’मध्ये बिझी आहे. हा चित्रपट अखेरच्या टप्प्यात आहे आणि यादरम्यान हृतिकने ‘क्रिश 4’ची तयारी सुरू केली आहे. आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने एक व्हिडिओ शेअर करत, त्याने याची माहिती दिली. या सीरिजबद्दलचा अनुभवही त्याने शेअर केला.

एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ज्या उंचीवर तुम्ही आहात किंवा जिथे तुम्हाला पोहोचायचे, तिथपर्यंतचे अंतर पाहुन तुम्हाला भीती वाटते? ‘क्रिश’ माझ्यासाठी हे अंतर पार करण्यासाठीचा संघर्ष, प्रेरणा व प्रयत्नांसारखा आहे. डॅडने या चित्रपटाबद्दल विचार केला तेव्हा, मी मनातून घाबरलो होतो. अनेक प्रकारचा संशय, अनिश्चितता, भीती मनात होती. पण आम्ही या भीतीवर मात करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि टीम वर्कने या विजयी झालोत. आज आम्ही ‘क्रिश 4’पर्यंतचे अंतर पार करण्याच्या टप्प्यावर आहोत. आजही मला तीच भीती जाणवतेय, जी चार वर्षांपूर्वी जाणवली होती. यामुळे मला वाटतेय की, आम्ही योग्य मार्गावर आहोत.हृतिकच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. तूर्तास हृतिक ‘सुपर 30’मध्ये बिझी आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक एका नॉन ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहे. यात तो एका गणितज्ञाची भूमिका साकारताना दिसेल. चित्रपटाच्या दोन्ही पोस्टर्सने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.  

टॅग्स :हृतिक रोशनक्रिश 4