अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट २०२५ मधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर अशी चर्चा होताना दिसते आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलला पहिली पसंती नव्हती. निर्मात्यांना या भूमिकेसाठी विकीच्या आधी एखाद्या साऊथ सुपरस्टारला कास्ट करायचे होते, असे बोलले जात आहे.
काही प्रादेशिक पोर्टलच्या वृत्तानुसार, संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी महेश बाबू निर्मात्यांची पहिली पसंती होती. @TeluguChitraalu या पोर्टलने ट्विट केले की दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रथम महेश बाबूशी संपर्क साधला होता, परंतु दक्षिणेकडील स्टारने यात रस दाखवला नाही आणि त्यामुळे महेश बाबू चित्रपटाचा भाग बनले नाहीत. नंतर लक्ष्मणने विक्की कौशलशी संपर्क साधला आणि त्याने लगेच होकार दिला.
महेश बाबू ही छावासाठी होती पहिली पसंती?काही पोर्टल्सने केलेल्या तथ्य तपासणीनुसार, महेश बाबूने छावाशी संपर्क साधल्याची व्हायरल झालेली बातमी चुकीची आहे. २३ तेलगूच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वीच सांगितले होते की, छावामधील संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशल व्यतिरिक्त त्यांच्या मनात कोणताही अभिनेता नव्हता. खरेतर, छावाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये लक्ष्मण उतेकर यांनी खुलासा केला होता की, विकी कौशल हा छावासाठी नेहमीच माझा एकमेव पर्याय राहिला आहे. माझ्या स्वप्नातही छावासाठी तो माझा हिरो आहे. विकीसारख्या अभिनेत्याला घेऊन कोणताही दिग्दर्शक चांगला चित्रपट बनवू शकतो. तो केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर एक महान माणूसही आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण हा छावा (विकी कौशल) मला माझ्या छावासाठी मिळाला आहे.
छावाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनछावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, अवघ्या एका आठवड्यात या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने सात दिवसांत २१९ कोटींची कमाई केली आहे. छावा हा २०२५ चा पहिला हिट हिंदी चित्रपट आहे.