Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचेच 'भगव्या' बिकिनीतील फोटो व्हायरल, 'पठाण'वरील कमेंट स्वत:वरच उलटली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 20:22 IST

'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 'पठाण' चित्रपटातील गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या वादात विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेत इतकी अश्लिलता कुठून आणता? अशी कमेंट करत गाण्यावर आक्षेप नोंदवला. त्यावर आता नेटिझन्सनं विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचेच भगव्या बिकिनीतील फोटो ट्विट करत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिकाच्या चाहत्यांनी अग्निहोत्री यांना आरसाच दाखवला आहे. विवेक अग्निहोत्रीच्या मुलीनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीनंही भगव्याच रंगाची बिकिनी परिधान केल्याचं फोटोत दिसत आहे. हे फोटो दुबईतील वेकेशनचे असल्याचं सांगितलं जात आहे. मल्लिका अग्निहोत्रीच्या याच भगव्या बिकिनीतील फोटोवरुन विवेक अग्निहोत्री नेटिझन्सच्या निशाण्यावर आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी पठाण चित्रपटाच्या गाण्यावर टीका करताना एका तरुणीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. नंतर अग्निहोत्री यांची मुलगी मल्लिका हिचे भगव्या रंगातील बिकिनीतील पोस्ट केले. 

नेटिझन्सनं ट्रोल केल्यानंतर मल्लिका अग्निहोत्रीनं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट मोडवर स्विच केलं आहे. विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून 'पठाण'च्या निर्मात्यांवर टीका करत आहेत. त्यात आता नेटिझन्सना अग्निहोत्री यांच्या मुलीचे भगव्या रंगातील बिकिनीतील फोटो म्हणजे आयतं कोलीत हातात मिळालं आहे. विवेक अग्निहोत्री यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर नेटिझन्सच्या ट्रोलिंगला त्यांना सामोरं जावं लागत आहे.

टॅग्स :पठाण सिनेमा