Join us
Daily Top 2Weekly Top 5

या गायकाने केली अनेक वर्षाच्या व्यसनावर मात, लोकांना केले व्यसनापासून दूर राहाण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 07:15 IST

या गायकाने सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट लिहून त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देविशाल ददलानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने या पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की ऑगस्ट 2019 पासून मी स्मोकिंग पूर्णपणे सोडले आहे.

आपल्या वाईट सवयींवर मात करणे खूपच कमी जणांना जमते. पण आता एका गायकाने आपल्या एका वाईट सवयीवर पूर्णपणे मात केली असून त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

विशाल ददलानीने आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले असून त्याच्या सगळ्याच गाण्यांवर तरूणाई फिदा असते. शांत तसेच उडत्या चालीच्या गाण्यांना संगीत देण्याची त्याची ख्याती असून त्याने काहीच दिवसांपूर्वी विठ्ठल या मराठी चित्रपटात विठ्ठला विठ्ठला हे गाणे गायले होते. विशाल एकेकाळी दिवसाला 40 हून अधिक सिगारेट पित असे. या सगळ्याचा त्याच्या आवाजावर देखील परिणाम झाला होता. त्याचा आवाज पूर्णपणे खराब झाला होता. गेल्या नऊ वर्षांपासून तो या व्यसनाच्या आहारी गेला होता. पण आता त्याने त्याच्या या व्यसनावर मात केली असून सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे.

विशाल ददलानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने या पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की ऑगस्ट 2019 पासून मी स्मोकिंग पूर्णपणे सोडले आहे. गेली नऊ वर्षं मी दिवसाला 40 हून अधिक सिगारेट ओढत होतो. मी कोणाला सांगितले नाही. पण या सगळ्याचा मला त्रास व्हायला लागला होता. माझ्या आवाजातील मृदूपणा नाहिसा झाला होता. मी गेल्या काही वर्षांपासून या व्यसनापासून मुक्त व्हायचा प्रयत्न करत होतो. पण आता सहा महिने झाले मी सिगारेटला स्पर्श देखील केलेला नाहीये. मला कोणताही त्रास न होता मी आता गाऊ शकेन याचा मला आनंद होत आहे. तुम्ही स्मोकिंग करत असाल तर आताच सोडून द्या... अन्यथा याचे दूरगामी परिणाम तुमच्या शरीरावर होतील. 

टॅग्स :विशाल ददलानी