Join us

Vikram Gokhale Health Update : अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:31 IST

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ही माहिती दिली. विक्रम गोखले यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. त्यांचा रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत.

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत शुक्रवारी थोडीशी सुधारणा झाली होती. त्यावेळी शिरीष याडगीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते, विक्रम गोखले यांच्या तब्येतीत आश्वासक सुधारणा होते आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला जावू शकतो, असं वाटत आहे. त्यांचा रक्तदाब आणि ह्रदयाची क्रिया स्थिर आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे विक्रम गोखले यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून अथक प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :विक्रम गोखले