Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 18:59 IST

Kushi Movie : कुशीचे दिग्दर्शन एसजे सूर्या यांनी केले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.

'ऊँ अंटावा गर्ल' समंथा रुथ प्रभू आणि 'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडा यांचा 'कुशी' चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा राहिला असेल तर काही हरकत नाही. हा चित्रपट आता तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तेही हिंदी भाषेत. याशिवाय तुम्ही हा चित्रपट तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही पाहू शकता.

कुशीचे दिग्दर्शन एसजे सूर्या यांनी केले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. हलकीफुलकी कथा तुमचे मनोरंजन करेल. सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर करत असे लिहिले की, 'आता आनंदाने किंचाळा, लाथ मारा आणि आनंदाने हसा कारण #कुशी नेटफ्लिक्सवर येत आहे! तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल! 

समंथा रुथ प्रभूने घेतला ब्रेकसमंथा रुथ प्रभूला ऑटोइम्यून रोग मायोसिटिसचे निदान झाले आहे, ज्यासाठी तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिने काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला आहे. तिने नुकतेच सांगितले की, स्टिरॉइड शॉट्स घेतल्याने तिच्या चेहऱ्यावर डाग पडले आहेत, त्यामुळे ती फिल्टर वापरून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडासमांथा अक्कीनेनी