Join us

आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:21 IST

एका फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे. तर अभिनेत्री त्याच्या समोर कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसली.

Vijay Devarkonda Rashmika Mandanna : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बऱ्याच दिवसांपासून डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपुर्वीच विजयने तो सिंगल नसून  एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं कन्फर्म केलं होतं. मात्र, त्याने अभिनेत्रीचं नाव सांगितलं नव्हत. अशातच आता त्याचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो एका अभिनेत्रीसोबत दिसून येत आहे. 

नुकतंच विजय आणि रश्मिकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. दोघेही एका कॅफेमध्ये जेवण करताना दिसले आहेत. रश्मिका कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसली.  तिने डेनिमसोबत निळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. तर विजयही निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये हँडसम दिसतोय. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अनेक चाहत्यांनी त्यांना क्यूट कपल म्हटलं आहे. 

विजय आणि रश्मिका हे  'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या सुपरहिट सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती.  एकत्र काम केल्यानंतर विजय आणि रश्मिका मंदाना यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. रश्मिकाने अनेक वेळा विजयच्या घरी काढलेले फोटो पोस्ट केले आहेत.  दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका  पुष्पा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विजयचा 'VD 12' हा आगामी चित्रपट आहे.  प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. 

टॅग्स :विजय देवरकोंडारश्मिका मंदाना