Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालन आहे सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी, लहानपणीच्या मैत्रिणीसोबतही नव्हता टिकला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:36 IST

सिद्धार्थ रॉय कपूरची 'मार्केटिंगचा बादशाह' अशीही ओळख आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर (Siddharth Roy Kapur) वैयक्तिक आयुष्यात फारसे माध्यमांसमोर येत नाहीत. तरी त्यांचं आयुष्य कायम चर्चेत राहिलं आहे. ५० वर्षीय सिद्धार्थ कपूर मुंबईतच जन्माला आले आहेत. एकापेक्षा एक दर्जेदार हिंदी सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. विद्या बालनशीलग्न केल्यानंतर ते आणखी चर्चेत आले. पण तुम्हाला माहितीये का विद्या बालन त्यांची तिसरी पत्नी आहे. याआधी सिद्धार्थ कपूरचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे.

सिद्धार्थ रॉय कपूर यांची ओळख केवळ विद्या बालनचे (Vidya Balan) पती अशी नाहीए. त्यांनी विद्याशी लग्न करण्यापूर्वी अनेक हिंदी सिनेमांची निर्मिती केली आहे. तसंच त्यांनीही त्यांच्या करिअरमध्ये संघर्ष केला आहे. त्यांनी 'दंगल', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हिरोईन', 'बर्फी'  सारखे दर्जेदार चित्रपट दिले. १९९४ साली त्यांनी रॉनी स्क्रुवाला यांची कंपनी यूटीव्हीमध्ये इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना केवळ २ हजार रुपये मिळायचे. त्यांनी 'रंग दे बसंती','खोसला का घोसला' सारख्या सिनेमांचं मार्केटिंग केलं होतं. २०१४ मध्ये त्यांनी डिझ्नी इंडनया मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु केलं आणि चॅनल्सला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यामुळेच त्यांना मार्केटिंगचा बादशाह म्हटलं जातं. 

प्रोफेशनल आयुष्य सुरळीत सुरु असतानाच वैयक्तिक आयुष्यात मात्र फारसं काही आलबेल नव्हतं. त्यांनी लहानपणीची मैत्रीण आरती बजाजसोबत लग्नगाठ बांधली. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. नंतर त्यांनी टीव्ही निर्माती कविताशी लग्न केलं. मात्र 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर सिद्धार्थ पहिल्याच नजरेत विद्या बालनच्या प्रेमात पडले होते. पण विद्याने प्रेमाची कबुली देण्यासाठी वेळ लावला. अखेर 14 डिसेंबर 2012 रोजी सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन यांनी पंजाबी आणि तमिळ अशा दोन्ही पद्धतीने लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूडपरिवारलग्न