Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: "डर के आगे जीत है" म्हणत प्रिया मराठेने स्विकारले हे आव्हान, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 11:57 IST

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतही तिने गोदावरी ही व्यक्तीरेखा साकारली. अशा विविध भूमिकेत प्रिया आपल्याला पाहायला मिळाली आहे.

 प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं. तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली. मात्र पवित्र रिश्ता मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली. बडे अच्छे लगते है, कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने साथ निभाना साथिया या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतही तिने गोदावरी ही व्यक्तीरेखा साकारली. अशा विविध भूमिकेत प्रिया आपल्याला पाहायला मिळाली आहे. 

यापलिकडे प्रिया आपले  खाजगी आयुष्यही फुल ऑन एन्जॉय करते तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यांत ती फायर पान खात असल्याचे पाहायला मिळतंय. सुरूवातीला काहीशी घाबरलेली प्रियाने हा पान खाण्याचे धाडस केले आहे. हा अनुभव थ्रिलींग आणि तितकाच मजेशीर असल्याचे तिने म्हटले आहे. हा व्हिडीओला तिने ''डर के आगे जीत है'' असे कॅप्शनही दिले आहे.

टॅग्स :प्रिया मराठे