Join us

'पुष्पा २' फेम रश्मिका मंदानाच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडीओ होतोय व्हायरल, सिंपल लूकवर फिदा झाले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:12 IST

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या खूप चर्चेत आहे, कारण नुकताच तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट पुष्पा - द रुल प्रदर्शित झाला आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या खूप चर्चेत आहे, कारण नुकताच तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा - द रुल' (Pushpa-The Rule) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा ती श्रीवल्लीच्या भूमिकेत भेटीला आली आहे. सीक्वलमधील तिच्या कामाचं खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, रश्मिका मंदानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना खूपच तरुण, निरागस आणि क्यूट दिसत आहे. रश्मिका मंदान्नाचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप भावतो आहे. 

हा व्हिडीओ रश्मिका माय शाइन या इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. या व्हिडीओत ती सिंपल लूकमध्येही खूप क्यूट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना स्वतःबद्दल सांगताना दिसत आहे आणि कदाचित काही संवाद बोलताना दिसते आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या पहिल्या ऑडिशनच्या वेळी ती फक्त १९ वर्षांची होती. यावेळीही ती खूप आत्मविश्वासाने ऑडिशन देताना दिसत आहे.

चाहते म्हणताहेत - ये है असली फायररश्मिका मंदानाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका चाहत्याने कमेंट केली आहे की ती तेव्हाही खूप क्यूट दिसत होती. दुसऱ्या एका युजरने लिहिले की ये है असली फायर. काही चाहत्यांना शंका आहे की हा एआय जनरेट केलेला व्हिडिओ असू शकतो. कारण याआधीही रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका चाहत्याने लिहिले की जर ते एआय जनरेट केलेले नसेल तर ते खरोखर भारी आहे.

वर्कफ्रंटरश्मिका मंदानाने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. तिने मिशन मजनू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती गुडबायमध्ये झळकली. तसेच रणबीर कपूरचा सुपरहिट चित्रपट अॅनिमलमध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली होती. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झाले. आता ती पुष्पा २मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानापुष्पा