Join us  

मराठी अभिनेत्रीच्या गर्भाशयावर पार पडली शस्त्रक्रिया, पोस्ट करत म्हणाली, 'गंभीर प्रक्रिया...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 1:20 PM

अभिनेत्रीने तिच्या तब्येतीसंदर्भात अपडेट दिलं आहे.

व्हिडिओ जॉकी अनुषा दांडेकरने (Anusha Dandekar) नुकतीच एक पोस्ट केली आहे ज्यामुळे चाहते काळजीत पडलेत. अनुषाने तिच्या तब्येतीसंदर्भात अपडेट दिलं आहे. तिच्या गर्भाशयात काही गाठी आढळल्याने तिच्या गर्भाशयावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करत इतर मुली, महिलांना आवाहन केलं आहे.अनुषा मराठमोळी सेलिब्रिटी आणि फरहान अख्तरची दुसरी पत्नी शिवानी दांडेकरची सख्खी बहीण आहे.

अनुषा लिहिते, 'हॅलो, थोडक्यात सांगते, नुकतीत माझ्या गर्भाशयावर शस्त्रक्रिया झाली. गर्भाशयात गाठी झाल्याने ती प्रक्रिया फार गंभीर होती. पण नशिबाने शेवटी सगळं ठीक झालं. प्रक्रिया सुरु असतानाच आणखी काही गाठी आढळल्या, त्यामुळे तेव्हाच त्या काढण्यात आल्या. 

ती पुढे म्हणाली, 'माझी पोस्ट वाचणाऱ्या सर्व मुलींना मी सांगू इच्छिते की,  वर्षांतून एकदा तरी गायनॉकॉलॉजिस्टची भेट घ्या. तुमच्या स्वास्थ्यासाठी आणि सुरक्षेसाठी ते गरजेचं आहे. मी वयाच्या १७ व्या वर्षापासूनच चेकअप करते म्हणूनच मी आज बरी होऊ शकले. मला मदत करणाऱ्या डॉक्टरांचे खूप खूप आभार. पूर्णपणे तब्येतीत लुधार आलेला नाही वेळ लागेल पण आज इतक्या दिवसांनी घराबाहेर पडून बरं वाटतंय. '

अनुषा व्हिडिओ जॉकी म्हणून काम करते. नुकतेच तिला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर च्या उद्घाटनात दिसली. या ठिकाणी तिने अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या. अनुषा टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्रा सोबतच्या अफेअरमुळे आणि ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. 

टॅग्स :अनुषा दांडेकरमराठी अभिनेताशिबानी दांडेकर