Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीनच्या पत्नीला वर्सोवा पोलिसांचे समन्स; सासूच्या तक्रारीनंतर FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 07:21 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची दुसरी पत्नी आलिया हिला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी समन्स बजावले.

मुंबई :

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची दुसरी पत्नी आलिया हिला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी समन्स बजावले. नवाजुद्दीनची आई मेहरुन्निसाने तिच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आलिया नवाजुद्दीनच्या वर्सोवा येथील बंगल्यात गेली होती. त्यावेळी तिथे मेहरुन्निसा या उपस्थित होत्या. दोघींमध्ये बाचाबाची झाली. उभयतांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संपत्तीच्या मुद्यावरून वाद सुरू आहे. आलियाविरोधात मेहरुन्निसा यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आलियाविरोधात गुन्हा दाखल करून तिला चौकशीसाठी समन्स बजावले. दरम्यान, यासंदर्भात आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. त्यात मी माझ्या पतीच्या घरात प्रवेश केला आणि माझ्याविरुद्ध काही तासातच एफआयआर त्वरित दाखल केला जातो. मला कधी न्याय मिळेल का, असा प्रश्न आलियाने उपस्थित केला. आलियाने ६ मे २०२० रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु २०२१ मध्ये तिने तो निर्णय मागे घेतला. कारण कोव्हिडदरम्यान नवाजुद्दिनने तिची काळजी घेतली होती आणि त्यामुळे त्यांच्यातील मतभेद दूर ठेवण्याचे तिने ठरविले.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी