Join us

वरूण धवनने जिंकली मोदक खाण्याची स्पर्धा, खाल्ले तब्बल इतके मोदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 21:00 IST

आपल्या आगामी सुई धागा या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकार वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी स्टार प्लसवरील खास शो ‘अद्‌भुत गणेश उत्सव’ मध्ये येऊन नुकतेच बाप्पाचे आशिर्वाद घेतले आणि आरतीसुद्धा केली.

गणेश चतुर्थी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्टार प्लस वाहिनीवर एक खास कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना गणेशोत्सव या सणाचा आनंद घरबसल्या घेण्याची सोय ‘स्टार प्लस’ वाहिनीने केली आहे. या वाहिनीने भव्य सेट, नामवंत व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असलेल्या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन ‘अद्भुत गणेशोत्सव’ नावाने केले आहे. या कार्यक्रमासाठी नुकतेच वरुण धवन आणि अनुष्का शर्माने चित्रीकरण केले. ते दोघे सुई धागा या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. 

आपल्या आगामी सुई धागा या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकार वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी स्टार प्लसवरील खास शो ‘अद्‌भुत गणेश उत्सव’ मध्ये येऊन नुकतेच बाप्पाचे आशिर्वाद घेतले आणि आरतीसुद्धा केली. वरूण फिटनेस प्रेमी म्हणून ओळखला जातो. तो दररोज न चुकता व्यायाम करतो. तसेच दिवसभरात काय खायचे, किती खायचे हे त्याचे ठरलेले असते. डाएटच्या बाबतीत तो खूपच स्ट्रीक आहे. पण त्याचा डाएट विसरून तो मोदक खाण्याच्या स्पर्धेत भाग घेताना दिसला. अद्‌भुत गणेश उत्सव या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी वरुण आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मोहसिन खान यांच्यात ही स्पर्धा रंगली होती. वरुणने कमी वेळात १२ मोदक खाऊन ही स्पर्धा जिंकली. अनुष्कासह सगळेच जण त्याचा मोदक खाण्याचा वेग पाहून थक्क झाले. वरूण गणपती बाप्पाचा निस्सीम भक्त आहे, त्यामुळे आपले डाएट मोडताना त्याने एक क्षणसुद्धा विचार केला नाही. एवढेच नाही तर दिव्यांका त्रिपाठी आणि मोहसिन खानने वरूणला त्याच्या ‘जुडवा २’ मधील ‘गणपती बाप्पा मोरया परेशान करे मुझे छोरीयां’ या गाण्यावर नाचण्याची विनंती केली आणि वरूणने ही विनंती अगदी आनंदाने मान्यसुद्धा केली आणि आपल्या या गाण्यातील सिग्नेचर स्टेपसह सर्वांचे उत्तम मनोरंजन केले.

टॅग्स :वरूण धवनसुई-धागाअनुष्का शर्मादिव्यांका त्रिपाठी