Join us

वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 13:24 IST

23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे.

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी या लग्नाला हजेरी लावू शकतात. वरुण धवनने आमंत्रित व्यक्तींची यादी छोटी ठेवली असेल, तरी यादीत बॉलिवूड सेलिब्रेटींचा समावेश आहे . रिपोर्ट्सनुसार शाहरुख खान, सलमान खान आणि करण जोहर वरुणच्या लग्नाला पोहोचू शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कतरिना कैफही वरुणच्या लग्नाला येण्याची शक्यता आहे. द मेन्शन हाऊस या ठिकाणी नताशा व वरूणचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. तूर्तास द मेन्शन हाऊसमध्ये या सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. 22 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत लग्नाचे फंक्शन सुरु राहणार आहेत. 

रिपोर्टनुसार या लग्नाला सलमान खान, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, आलिया भट, साजिद नाडियाडवाला आणि शाहरुख खान सामील होणार आहेत. लग्नात अगदी मोजके पाहुणे असतील. यानंतर मुंबईत एक ग्रॅण्ड रिसेप्शन देण्यात येईल. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी होतील.

ज्याठिकाणी वरूण व नताशाचे लग्न होणार आहे, ते मेन्शन हाऊस सुमारे १ एकर जागेत पसरले आहे. या अलिशान रिसॉर्टमध्ये 25 खोल्या, स्विमींग पुल, सीक्रेट गार्डन, रेस्टारंट,स्पा, पूल साईड कबाना अशा सगळ्या सुविधा आहेत. 23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे. यानंतर 24 जानेवारीला हिंदू पद्धतीने दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. वरूण धवन व नताशा बालपणाचे मित्र आहेत. शाळेतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल