Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूण धवनने वडिलांना दिली अनोखी भेटवस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:30 IST

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याचे वडील डेविड धवन यांना वाढदिवसादिवशी त्यांना खास भेटवस्तू दिली आहे.

ठळक मुद्दे'सुई धागा- मेड इन इंडिया' २८ सप्टेंबरला होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याचे वडील डेविड धवन यांना वाढदिवसादिवशी त्यांना खास भेटवस्तू दिली आहे. काय असेल ही भेटवस्तू हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. वरूणने डेविड धवनला स्वतःच्या हाताने शिवलेले शर्ट गिफ्ट दिले आहे. शर्ट शिवतानाचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. 

वरूणने शर्ट शिवतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून लिहिले की, वडीलांना नेहमीच सरप्राईज देणे कठीण असते. पा पहा तुमचा मुलगा सुईधागामध्ये माहिर झाला आहे. हे शर्ट वडिलांना वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून दिले आहे. बाकी बप्पा आणि पप्पांमुळे...सर्व काही छान आहे.

वरूणला शर्ट तयार करण्यासाठी तीन तास लागले. डेविड धवन ६३ वर्षांचे झाले आहे. परंतू वडिलांना स्वतःच्या हाताने शिवलेले गिफ्ट देऊन वरुण फसला आहे. कारण डायरेक्टर शशांक खेताननेही वरुणकडे एका शर्टची मागणी केली आहे. शशांकने वरुणची पोस्ट रि-ट्वीट करत लिहिले की, 'वाह माझ्या मौजी… माझा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये असतो... शक्य झाले तर माझ्यासाठी शर्ट शिवून दे...नाहीतर कमीत कमी एक रूमाल भेट म्हणून दे. तुझा मित्र शशांक.

 

वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट 'सुई धागा- मेड इन इंडिया' २८ सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात वरुणने मौजी नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का या चित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे

टॅग्स :वरूण धवन