Join us
Daily Top 2Weekly Top 5

 ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रियंकासोबत नव्हता निक जोनास, पण पाठवले खोलीभर गुलाब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:32 IST

काल निक जोनास प्रियंकासोबत नव्हता. तरीही प्रियंकाचा व्हॅलेन्टाईन डे स्पेशल होता...

ठळक मुद्देप्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले.

14  फेब्रुवारी अर्थात कालचा व्हॅलेन्टाईन डे प्रत्येकाने आपल्या पार्टनरसोबत सेलिब्रेट केला. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसाठीही कालचा दिवस यादगार राहिला. अनेकांनी आपल्या व्हॅलेन्टाईनसोबतचे फोटो शेअर करत, एकमेकांना रोमॅन्टिक अंदाजात विश केले. प्रियंका चोप्राचा मात्र जरा हिरमोड झाला. होय, कारण काल निक जोनास तिच्यासोबत नव्हता. अर्थात तरीही प्रियंकाचा व्हॅलेन्टाईन डे स्पेशल होता. होय, निकने दूर राहूनही तो स्पेशल बनवला. कसा तर त्याने इतकी गुलाबाची फुलं पाठवलीत की, प्रियंकाची खोली लाल गुलाबांनी भरून गेली.

प्रियंकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती सोफ्यावर बसलेली दिसतेय आणि तिच्या अवतीभवती खूप सारे गुलाब आहेत. खोलीत ठिकठिकाणी कँडल्स जळत आहेत. म्हणजेच खोलीतील वातावरण अगदी रोमॅन्टिक आहे. प्रियंका सोफ्यावर बसून गुलाबाची फुलं न्याहाळतेय. शिवाय निकच्या आठवणीने व्याकूळ झालीये. ‘काश, तू इथे असता आणि सोबत काही फुलं...,’ असे तिने लिहिले. यावर निकनेही लगेच कमेंट केली. ‘फक्त आणखी काही दिवस...,’असे त्याने लिहिले.

प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली होती.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती.  प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. शिवाय प्रॉपर्टीच्या बाबतीतही ती निकच्या कितीतरी पुढे आहे. प्रियंका सुमारे 200 कोटींच्या प्रॉपटीर्ची मालकीन आहे. तर निककडे 175 कोटींची प्रॉपर्टी आहे. प्रियंका आणि निक दोघांनाही लक्झरी लाईफ आवडते. दोघांकडेही महागड्या गाड्या आहेत, अलिशान बंगले आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास