Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैदेहीने जागवल्या 'सिम्बा'च्या आठवणी, शेअर केला 'हा' व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 06:30 IST

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे.

ठळक मुद्देवैदेहीचे अभिनया इतकेच नृत्यावर देखील प्रेम आहे वैदेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून 10 वर्षापूर्वी मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते. वैदहीचे अभिनया इतकेच नृत्यावर देखील प्रेम आहे. वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

नुकताच तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रोहित शेट्टीच्या सिम्बाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने त्याला कॅप्शनदेखील दिले आहे. वैदही लिहिते, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सिनेमा आहे. मी रोहित शेट्टीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेले तेव्हा नर्व्हस होते मला वाटलंही नव्हते. 'सिम्बा'मधील भूमिका मी साकारु शकेन. सिम्बाच्या संपूर्ण टीमचे वैदेहीने आभार मानले आहेत. 

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.         

टॅग्स :वैदेही परशुरामीसिम्बा