Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण राहिलेले स्वप्न 'या' माध्यमातून पूर्ण करणार वैभव मांगले, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 07:15 IST

युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभवचा हा पैलू सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'युवा सिंगर, एक नंबर' या नव्याकोऱ्या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिल्यानंतर 'जज कोण असणार ?' हा प्रश्न सगळ्यांनाच सतावू लागला होता. या गहन प्रश्नाचे उत्तर अखेर प्रेक्षकांना मिळाले आहे. कार्यक्रम जसा हटके आणि निराळा असणार आहे, तसेच या कार्यक्रमातील दोघांपैकी एक परीक्षक थोडे वेगळे आहेत. चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून पडद्यावर दिसणारा व रंगभूमीवर सुद्धा आपल्या अभिनयाची झलक दाखवणारा वैभव मांगले, या कार्यक्रमातील स्पर्धकांचे परीक्षण करणार आहे. 

वैभव मांगलेला गायनाची आवड आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे कि वैभवने गाण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. लोकप्रिय विनोदी व्यक्तिरेखा साकारणारा वैभव हा एक उत्तम गायक देखील आहे. युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभवचा हा पैलू सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तरुण स्पर्धकांना मार्गदर्शन करत, वैभव भावनिकदृष्ट्या देखील त्यांना सूचना करेल. 

एका वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून फार कुणाला माहित नसलेली वैभवची प्रतिभा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर येईल. अभिनय क्षेत्रात आपली खास छाप पाडणाऱ्या या नटाला मुळात गायक व्हायचे होते, हे फार थोड्या मंडळींना ठाऊक आहे. परीक्षण करण्याची संधी व स्वप्नपूर्ती झालेली असल्याने, या नव्या भूमिकेत शिरणे वैभवला फार आनंदाचे असणार आहे. वैभवचा स्पष्टवक्तेपणा सगळ्यांचं माहिती आहे आणि त्याच्या चटपटीत कॉमेंट्समुळे कार्यक्रमाची रंगात अजून वाढेल व प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच मिळेल. 

टॅग्स :वैभव मांगलेझी युवा