Join us

OMG! फोटो पाहून लोकांनी म्हटले ‘कुपोषित’, भडकली वाणी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:09 IST

होय, वाणीने जिममधील एक फोटो शेअर केला आणि नेटक-यांनी तिची खिल्ली उडवणे सुरु केले.

ठळक मुद्देमॉडेलिंगपासून सुरुवात करणा-या वाणी कपूरने ‘शुद्ध देसी रोमांस’ या सिनेमातून  बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला होता.

हृतिक रोशन व टायगर श्रॉफसोबत ‘वॉर’ या सिनेमात दमदार अ‍ॅक्टिंग करणारी अभिनेत्री वाणी कपूर सध्या ट्रोल होतेय. होय, वाणीने जिममधील एक फोटो शेअर केला आणि नेटक-यांनी तिची खिल्ली उडवणे सुरु केले. वाणीचा हा फोटो पाहून एका युजरने चक्क वाणीला ‘कुपोषित’ म्हटले. काय तू कुपोषित आहेस? असा सवाल या युजरने केला.

युजरचा हा प्रश्न पाहून वाणी कपूर जाम भडकली. मग काय ट्रोल करणा-या या युजरला तिनेही खरमरीत उत्तर दिले. ‘तू तुझ्या आयुष्यात काही ठोस काम का शोधत नाहीस. प्लीज स्वत:बद्दल इतका कठोर होऊ नकोस. आयुष्य सुंदर आहे. द्वेष पसरवणे बंद कर,’ असे वाणीने त्याला सुनावले.

काही दिवसांपूर्वी वाणी एका वेगळ्याच कारणाने ट्रोल झाली होती. वाणीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत वाणीने डीप नेक टॉप परिधान केला होता. या टॉपमध्ये  कमालीची सुंदर दिसत असल्याने अनेकांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला होता. पण अचानक तिच्या या टॉपवर लिहिलेल्या अक्षरांवर लोकांचे लक्ष गेले आणि लोक भडकलेत होते.

होय, वाणीच्या या टॉपवर ‘हरे राम हरे कृष्णा’ लिहिलेले होते. यानंतर काहींनी तर तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तर काहींनी तिच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.  याविरोधात वाणीविरोधात तक्रारही नोंदवण्यात आली होती.मॉडेलिंगपासून सुरुवात करणा-या वाणी कपूरने ‘शुद्ध देसी रोमांस’ या सिनेमातून  बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘बेफिक्रे’ या सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसली होती. 

टॅग्स :वाणी कपूर