बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर(Vaani Kapoor)चा रविवारी म्हणजेच १७ नोव्हेंबरला सकाळी जयपूरमध्ये अपघात झाला. सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जयपूरमध्ये आहे. वाणी कपूर परकोटामधील बापू बाजारात फिरण्याचा सीन शूट करत होती. त्यादरम्यान जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीला तिची स्कूटी धडकली.
डेनिक भास्कर रिपोर्ट्सनुसार फिरण्याच्या सीन्समध्ये स्कूटी चालवण्याचे एक दृश्य देखील होते. जेव्हा वाणी स्कूटी चालवण्याचा सराव करत होती, तेव्हा स्कुटीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. लगेचच चित्रपटाच्या टीमने वाणीला सांभाळून घेतले. त्यामुळे तिला दुखापत झाली नाही.
'अबीर गुलाल'चं करतेय शूटिंगज्या चित्रपटाचे वाणी कपूर शूटिंग करत होती त्याचे नाव 'अबीर गुलाल' आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही त्यात दिसणार आहे. फवाद लवकरच जयपूरला येऊन त्याचे सीन शूट करेल, अशी माहिती मिळते आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की १८ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण जयपूरमधील शिव विलास हॉटेलमध्ये केले जाईल.
जयपूरशी वाणी कपूरचे कनेक्शन जयपूरशी वाणी कपूरचे जुने संबंध आहेत. तिच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण जयपूरमध्ये होते. वाणीचा पहिला चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स' होता, जो २०१३ साली रिलीज झाला होता. यात सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा होती. इतकेच नाही तर अभिनेत्रीने पर्यटनाची पदवी मिळविल्यानंतर जयपूरमधील ओबेरॉय हॉटेल्समध्ये इंटर्नशिप केली. तसेच एका हॉटेलमध्येही काम केले होते. शेवटची वाणी 'खेल खेल में' या चित्रपटात दिसली होती.