Join us

Urvashi Rautela: फ्लॉप सिनेमे देऊनही उर्वशी रौतेला आहे कोट्यधीश, जाणून घ्या तिच्या कमाईचा सोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:25 IST

एक अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाची कारकीर्द अद्याप फारशी यशस्वी राहिली नाही. परंतु कमाईच्या बाबतीत ती भल्याभल्याना मागे टाकते.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला  (Urvashi Rautela)फिल्मी दुनियेपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. उर्वशी एकापेक्षा एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. आज उर्वशी आपला वाढदिवस तिचा २९ वा वाढदिवस साजरा करते आहे. ‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्यानेही रसिकांवर मोहिनी घातली. आपल्या सौंदर्यासह हटके स्टाईलसाठी उर्वशी प्रसिद्ध आहे. नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते. उर्वशीला म्हणावं तसं यश बॉलिवूडमध्ये मिळालं नाही पण असं असताना ही अभिनेत्री लक्झरी लाइफ जगते. 

 ती बऱ्याचदा अशा सुपर हॉट आणि महागड्या फॅशनेबल लूकमध्ये दिसत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लहानाची मोठी झालेल्या उर्वशीने वयाच्या १५ व्या वर्षीच मॉडलिंगची सुरुवात केली. २००९ मध्ये तिने 'मिस टीन इंडिया' चा खिताब जिंकला.

तसंच तिने 'मिस इंडिया प्रिंसेस', 'मिस टूरिज्म वर्ल्ड', 'मिस इंडिया सुपरमॉडल' हे खिताबही तिच्या नावावर केले आहेत. उर्वशीने 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता सनी देओलने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री चित्रपट आणि गाण्यांमधून मोठी कमाई करतात. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ती एका गाण्यासाठी 35 ते 40 लाख रुपये घेते. एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय उर्वशीची अर्धी कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही येते. तिला अनेक मोठ्या फॅशन डिझायनर्सची शोस्टॉपर बनण्याचा फायदा झाला आहे .

 उर्वशीने नुकताच तेलुगू अभिनेता राम पोथिनेनीसोबत एक चित्रपटही साइन केला आहे. यावर्षी उर्वशी रणदीप हुडाच्या सहकलाकाराच्या भूमिकेत इन्स्पेक्टर अविनाश या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यापूर्वी हॉलिवूड अभिनेते मिशेल मोरोन आणि जेसन डेरुलो यांच्यासोबत एका अमेरिकन चित्रपटासाठी करार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलासेलिब्रिटी