Join us
Daily Top 2Weekly Top 5

Urvashi Dholakia: “सून येण्याच्या वयात हे काय?” ४३ वर्षाच्या उर्वशीने शेअर केले बोल्ड फोटो, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:44 IST

Urvashi Dholakia: ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून उर्वशी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या कोमोलिका या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली. हीच कोमोलिका सध्या ट्रोल होतेय.

टीव्ही इंडस्ट्रीत कोमोलिकाच्या नावाच्या ओळखली जाणारी उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) छोट्या पडद्यावरून गायब आहे. पण सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच उर्वशीचे लग्न झाले. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि यानंतर काहीच महिन्यांनी तिचा पतीसोबत घटस्फोट झाला. तेव्हापासून उर्वशी सिंगल मदर बनून दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. लवकरच उर्वशी ४४ वर्षांची होतेय. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून उर्वशी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या कोमोलिका या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली. हीच कोमोलिका सध्या ट्रोल होतेय.

होय, उर्वशी सध्या थायलंडमध्ये सुट्टी घालवतेय. यादरम्यानचे मोनोकिनीतील काही हॉट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आणि हे फोटो पाहून नेटकरी भडकले. या फोटोंमध्ये तिने प्रिंटेड मोनोकिनी परिधान केली आहे. समुद्रात होडीवर उर्वशीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. “लोक मला वाईल्ड म्हणतात आणि मी आनंदाने ते स्वीकारते,” असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

“काही दिवसांत तुला सून येईल. मुलासमोर असे कपडे घालणं, चांगलं वाटतं का?” अशी कमेंट करत एका युजरने तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्याने “तू मलायका अरोरा नाहीस”, अशी खाेचक कमेंट एकाने केली.  

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील 'कोमालिका' या व्यक्तिरेखेमुळे उर्वषी ढोलकिया नावारूपाला आली. याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. ती त्यानंतर अनेक मालिकांमध्ये झळकली. 'बिग बॉस' या शोचे तर तिने विजेतेपद मिळवले होते.  उर्वशीला सागर आणि श्रितिज हे दोन मुलं आहेत.  

टॅग्स :उर्वशी ढोलकियाटेलिव्हिजन