Join us

उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 13:42 IST

Urmila Matondkar : ‘कोरोना पॉझिटीव्ह’ उर्मिलांनी चाहत्यांना दिला हा सल्ला, वाचा ट्विट

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहेत. पण धोका कायम आहेच. आता बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला यांनी स्वत:  ट्विट करून ही माहिती दिली. (Urmila Matondkar tests positive for COVID-19) ‘माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी ठिक आहे. सध्या मी विलगीकरणात असून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करावी. तसेच दिवाळीच्या सणामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी,’असं उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या  ट्विटनंतर चाहत्यांनी त्या लवकर बºया व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे. अलिकडे प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या पहिल्या व दुसºया लाटेत तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भेट, विकी कौशल, अमृता अरोरा अशा अनेक स्टार्सचा समावेश होता. उर्मिला यांनी गेल्यावर्षी शिवसेने प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी बॉलिवूडचा एक गाळ गजवला.  रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, पिंजर अशा अनेक सिनेमांत उर्मिला यांनी दमदार भूमिका साकारल्या. अभिनेत्री म्हणून ‘नरसिम्हा’ हा उर्मिलांचा पहिला सिनेमा होता. पण त्यांना खरी ओळख दिली ती राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या सिनेमाने. 2008 साली ‘कर्ज’ या सिनेमात त्या अखेरच्या दिसल्या आणि यानंतर  2019 मध्ये राजकारणात येऊन उर्मिलाने नवी इनिंग सुरु केली. 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकोरोना वायरस बातम्या