Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिअरच्या शिखरावर असताना ‘रंगीला गर्ल’च्या या निर्णयामुळे सगळेच झाले होते हैराण, हे होते कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 08:00 IST

या कारणामुळे उर्मिला मातोंडकरला बसला होता धक्का,

ठळक मुद्देउर्मिलाने 2016 मध्ये कश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसिन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

47 वर्षांची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. तब्बल 13 वर्षानंतर एका वेबसीरिजच्या माध्यमातून ती रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोबत एक सिनेमाही तिने साईन केला आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये उर्मिलाने एकापेक्षा एक सरस सिनेमे दिलेत. रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, पिंजर अशा अनेक सिनेमांत तिने दमदार भूमिका साकारल्या. 2008 साली ‘कर्ज’ या सिनेमात ती अखेरची दिसली आणि यानंतर बॉलिवूडमधून अचानक बाद झाली. 2019 मध्ये राजकारणात येऊन उर्मिलाने नवी इनिंग सुरु केली.

  बालकलाकार म्हणून अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात करणा-या उर्मिलाने पुढे रंगीला, सत्या, मस्त अशा अनेक सिनेमांत काम केले. अभिनेत्री म्हणून ‘नरसिम्हा’ हा उर्मिलाचा पहिला सिनेमा होता. पण तिला खरी ओळख दिली तर राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या सिनेमाने. याच सिनेमादरम्यान उर्मिलाच्या  आयुष्यात एका व्यक्तिची एन्ट्री झाली. असे म्हणतात की, याच व्यक्तिमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले. ही व्यक्ती कोण तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.

रामगोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात पडले. पण उर्मिला याची कल्पनाही नव्हती. राम गोपाल वर्माच्या प्रत्येक सिनेमात उर्मिलाची वर्णी लागू लागली. असे म्हणतात की, राम गोपाल वर्मा उर्मिलावर इतके फिदा होते की, आपल्या आॅफिसच्या एका खोलीला त्यांनी ‘उर्मिला मातोंडकर’ हे नाव बहाल केले होते.

‘रंगीला’ हिट झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात उर्मिला व राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्याच. राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटातून ऐनवेळी माधुरी दीक्षितला हटवून उर्मिला साईन केले आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चांना जोर चढला.  राम गोपाल वर्मांची ही ‘दिवानगी’ लक्षात यायला उर्मिलाला बराच वेळ लागला. तोपर्यंत उर्मिलाच्या करिअरला ओहोटी लागली होती.

 असे म्हटले जाते की, राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसे पटायचे नाही. याचा फटका उर्मिलाला बसला. राम गोपाल वर्मांमुळे अन्य दिग्दर्शकांनी उर्मिलाचा फारसा विचार केला नाही. याचा परिणाम म्हणजे, हळू हळू तिला काम मिळणे बंद झाले आणि उर्मिला दूर फेकली गेली. खाडकन् जागे व्हावे, तशी उर्मिलाची अवस्था होती. यानंतर तिने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करणे बंद केले.

 

उर्मिलाने 2016 मध्ये कश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसिन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ती कार्यक्रमात अनेकदा पती मोहसिनसोबत दिसते.

टॅग्स :उर्मिला मातोंडकर