Join us

बघा 'संजू' सिनेमात न पाहिलेलं गाणं 'भोपू बज रहा है'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 15:44 IST

संजू हा सिनेमा बॉलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली. पण या सिनेमातील एक असं गाणं समोर आलं आहे जे सिनेमात वापरंच गेलं नाही.

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल करत असलेला 'संजू' सिनेमा सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा बॉलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली. पण या सिनेमातील एक असं गाणं समोर आलं आहे जे सिनेमात वापरंच गेलं नाही.

या गाण्याबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आधीच सांगितलं होतं. आता हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'भोपू बज रहा हैं' असे बोल असलेल्या या गाण्यात रणबीर कपूर, विकी कौशल आणि करिश्मा तन्ना आहेत. 

संजू या सिनेमाने आतापर्यंत ३२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतके आठवडे होऊनही या सिनेमा प्रेक्षक अजूनही गर्दी करत आहेत. अशातच या सिनेमातील हे गाणं रिलीज करण्यात आलंय. सध्या या गाण्यालाही पसंती मिळत आहे. 

टॅग्स :संजू चित्रपट 2018रणबीर कपूरराजकुमार हिरानी