Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैदेहीच्या मेहंदी समारंभात आले अनोळखी आगंतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:45 IST

'फुलपाखरू' या मालिकेने नुकताच १ वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.

ठळक मुद्देवैदेहीचा मेहेंदीचा समारंभ पार पडणार तिच्या घरी

झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. मानस आणि वैदेहीची अनोखी प्रेमकहाणी सगळ्यानांच भावली. प्रेक्षकांचे प्रेम आणि अखंड पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच १ वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. तसेच अल्पावधीतच 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन झाली आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 'फुलपाखरू'च्या तमाम चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या मालिकेत आता मानस आणि वैदेही यांचे नाते एक पाऊल पुढे जाऊन ते दोघेही लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत आणि या लग्न सोहळ्याची सुरुवात मेहंदीच्या दिमाखदार समारंभाने होणार आहे.

वैदेहीचा मेहेंदीचा समारंभ तिच्या घरीच पार पडणार असून तिच्या घराचीही सजावट केली आहे. मेहंदीचा समारंभ घरगुती असला तरी तितकाच दिमाखदार पार पडणार आहे. सर्व कुटुंबीय तसेच मित्रपरिवार आणि नातेवाईक या समारंभात आणि वैदेहीच्या आनंदात सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांना हा आनंद सोहळा अनुभवायला मिळणार आहे. मेहंदी समारंभात सर्व पाहुणे आनंदाने थिरकणार आहेत. नवरी वैदेही साध्या पेहेरावात देखील अत्यंत सुंदर दिसते आहे.

तिच्या या समारंभात काही आगंतुक देखील येणार आहेत. बुरखा घालून २ बायका तिच्या मेहंदी समारंभात सहभागी होणार आहेत. या बायका कोण असणार आहेत? त्या अशा गुप्तपणे या समारंभात कशा सहभागी झाल्या आणि त्यांचा काय उद्देश आहे? त्यांच्या येण्यामुळे काही अडचण निर्माण होणार का? हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहे. मानस व वैदेहीचा २९ जुलै दुपारी १२ वाजता आणि ७ वाजता छोट्या पडद्यावरील हा भव्य विवाह सोहळा झी युवावर पाहायला मिळणार आहे  आणि २३ जुलै  ते २८ जुलै दररोज रात्री ९ वाजता लग्नसराईची जंगी तयारी संपूर्ण आठवडाभर गाजेल. 

टॅग्स :फुलपाखरू