Join us

'भागो मोहन प्यारे'मध्ये पार पडणार अभूतपूर्व विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:15 IST

हा लग्नसोहळा अजब असणार यात शंकाच नाही. 

सामान्य माणसांना भूताखेतांची भिती वाटणं हे काही नवीन नाही, पण भूताने माणसाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणं आणि त्या माणसाच्या मागेच लागणं हे जरा जगावेगळच! पण आपल्या बिचा-या मोहनच्या नशिबात अश्याच एका भूताकडून पाठलाग होणं लिहिलेलं होतं. 

मधुवंतीने तिचा हट्ट सोडला नाही आणि मोहनकडे तिच्याशी लग्न करण्याला होकार देण्यावाचून पर्याय उरला नाही. आता एका भूताचं माणसाशी लग्न होत असेल तर तो सोहळा जगावेगळाच असणार ना? त्यातले विधी वेगळे, पद्धती वेगळ्या पण भावना तिच आणि त्यात साथीला असेल अख्खी भूतावळ! खवीस, मुंज्या, मानकाप्या,चेटकिणी, हडळी आणि बरच काही... हा लग्नसोहळा अजब असणार यात शंकाच नाही. 

या सा-यांच्या मधे फसलेला बिचारा मोहन हे लग्न झेपवू शकेल का? या लग्नातून पळ काढायचं ठरवलं तर ते तरी त्याला जमेल का? की मोहन आता कायमचा भूतावळींचा जावई होणार हे आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे ‘भागो मोहन प्यारे’ या झी मराठीवरच्या मालिकेत. तर हा जगावेगळा लग्नसोहळा २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरच्या भागात! ‘भागो मोहन प्यारे’ बुधवार ते शनिवार, रात्री ९.३० वाजता, फक्त झी मराठीवर!       

टॅग्स :भागो मोहन प्यारे