Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये उमेश कामतने शेअर केला प्रियासोबतचा फोटो यूजर्स म्हणाले, कमाल जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 10:12 IST

प्रिया आणि उमेश या दोघांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात. आपल्या खासगी जीवनातील बऱ्याच गोष्टीसुद्धा मनमोकळेपणाने दोघं इथं फॅन्ससह शेअर करतात.

उमेशने प्रिया सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया आणि उमेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे. प्रिया आणि उमेशच्या फॅन्सना त्यांचा हा रोमाँटिक फोटो खूपच आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यांच्या फॅन्सनी या फोटोवर केला आहे. बेस्ट कपल, कमाल जोडी अशा कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत.

दादा एक गुड न्युज आहे या नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशने निर्मिती श्रेत्रात पदार्पण केले आहे. आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. या 2013 साली 'टाईप प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया एकत्र दिसले होते.

प्रिया आणि उमेश या दोघांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करत आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच काम करता दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट