Join us

नववर्षाची दणक्यात सुरुवात! उमेश कामतने खरेदी केली नवी बाईक, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:50 IST

उमेश कामतनेही नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच उमेशने नवी कोरी बाईक खरेदी केली आहे.

२०२४ला निरोप देत नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत केलं गेलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक कलाकारांनी गोड बातम्या चाहत्यांना दिल्या. काहींनी घर घेतलं तर कोणी गाडी घेतली. नववर्षाच्या सुरुवातीला दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. तर अभिनेत्री रुपाली भोसलेने मर्सिडीज ही आलिशान कार घेतली. आता उमेश कामतनेही नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच उमेशने नवी कोरी बाईक खरेदी केली आहे. 

उमेशने triumph कंपनीची बाईक खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "हा पहिला मिनी vlog आहे♥️ माझं पहिलं प्रेम माझ्या आयुष्यात परत आलं 🏍️♥️ भाई @korlekarmania love you 🤘🏻 And of course बायको also आजची videographer", असं कॅप्शन उमेशने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे. 

उमेश कामत हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. गाजलेल्या मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. उमेश आणि प्रिया बापट हे कलाविश्वातील फेमस कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. त्या दोघांनी "आणि काय हवं?" ही वेब सीरिजही प्रचंड गाजली होती. 

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापटमराठी अभिनेता