Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रेस 3' सिनेमातील एका डायलॉगमुळे उदय चोप्रा ट्रोल, अशी उडवली त्याची खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 12:48 IST

तो अचानक सोशल मीडियात चर्चेत आलाय. तो चर्चेत येण्याचं कारण 'रेस 3' सिनेमातील एक डायलॉग ठरलाय. त्याने रेस 3 सिनेमातील एक डायलॉग ट्विट केलाय आणि त्यावरुन यूजर्सने त्याला ट्रोल केलंय. 

मुंबई : बॉलिवूडपासून बराच काळ दूर असलेला अभिनेता उदय चोप्रा सध्या काय करतो हे कुणालाच माहीत नाही. गेल्या काही वर्षात त्याला सिनेमाही मिळालेला नाही. अशात तो अचानक सोशल मीडियात चर्चेत आलाय. तो चर्चेत येण्याचं कारण 'रेस 3' सिनेमातील एक डायलॉग ठरलाय. त्याने रेस 3 सिनेमातील एक डायलॉग ट्विट केलाय आणि त्यावरुन यूजर्सने त्याला ट्रोल केलंय. 

 

 

 

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून रेस 3 सिनेमातील काही डायलॉग्सची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. एका एका डायलॉगवरुन सिनेमातील कलाकारांनाही ट्रोल केलं जात आहे. अनेक मेमेज तयार करण्यात आले आहेत. अशात आता उदय चोप्रालाही या सिनेमातील डायलॉगवरुन ट्रोल करण्यात आलंय. 

टॅग्स :उदय चोप्राबॉलिवूड