Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आदिपुरुष'वर टीका करणाऱ्या प्रेक्षकाला चाहत्याने पाठीत बुक्के घालून मारतानाचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:12 IST

प्रभासचे चाहते आणि सिनेमा न आवडणारे प्रेक्षक यांच्यात बाचाबाची झाली. याचे रुपांतर नंतर मारामारीतही झाले.

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा आज सगळीकडेच प्रदर्शित झाला. आदिपुरुषबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात दोन गटांमध्ये मारामारी झाली आहे. प्रभासचे चाहते आणि सिनेमा न आवडणारे प्रेक्षक यांच्यात बाचाबाची झाली. याचे रुपांतर नंतर मारामारीतही झाले. हा व्हिडिओ साऊथचा असून सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

'आदिपुरुष' आज देशभरात रिलीज झाला. रामायणावर आधारित या सिनेमात व्हीएफएक्स हे आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं. मात्र सिनेमात व्हीएफएक्सच गंडलं असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली. तसंच सैफचा लुक आणि अभिनयही फारसा आवडला नसल्याचा अनेकांचा सूर होता. दरम्यान हैदराबाद येथील एका थिएटरबाहेर प्रेक्षक सिनेमावर प्रतिक्रिया देत होते. तर एकजण सिनेमा आवडला नसल्याचं सांगत होता तोच तिकडून प्रभासचा चाहता भडकला. या भांडणात दोन गटच तयार झाले आणि प्रकरण मारामारीपर्यंत आलं. चाहत्यांनी त्या प्रेक्षकाला पाठीत बुक्के घालून धुतलं. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

अनेकांना आदिपुरुष फारसा आवडलेला नाही. बरेच जण सोशल मीडियावर सिनेमाला ट्रोलही करत आहेत. यातील सैफचा लुकही नापसंत केला जातोय. एकंदर 500 कोटी रुपये खर्च करुन बनवलेल्या या सिनेमाने अनेकांना निराश केलंय. तर दुसरीकडे काही जण सिनेमाचं कौतुकही करत आहेत. आता तुम्हाला कसा वाटतोय 'आदिपुरुष' थिएटरमध्ये जाऊनच कळेल.

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनसैफ अली खान