Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जपासून सेक्सपर्यंतच्या प्रत्येक विषयांवर माझ्या मुलांशी चर्चा करते - ट्विंकल खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:35 IST

पुन्हा एकदा ट्विंकल खन्ना सिनेमात सक्रिय झाली आहे.

मुंबई- अभिनेता अक्षय कुमारची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना काहीवर्षांपूर्वी सिनेसृष्टीत सक्रिय होती. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत ती सिनेसृष्टीपासून दूर राहिली. त्यानंतर ट्विंकलने पुस्तकं लिहायला सुरूवात केली. तिची पुस्तकही प्रेक्षकांना आवडली. आता पुन्हा एकदा ट्विंकल खन्ना सिनेमात सक्रिय झाली आहे. सिनेमात काम न करता ती पडद्यामागे काम करते आहे. 

ट्विंकल खन्ना तिच्या मुलांबरोबर अतिशय बिनधास्तपणे वागते. मुलांसमोर मी खूप धमाल-मस्ती करते. मुलांच्या डोक्यात खूप गोष्टी सुरू असतात म्हणून मी प्रत्येकवेळी त्यांच्याशी खुलेपणाने राहते. मुलांसमोर मी मस्करी सुरू करते. कारण त्यांच्याशी संवाद सुरू करण्याचं मस्करी हे उत्तम माध्यम आहे, असं मला वाटतं. घरामध्ये मुलांसमोर मी ड्रग्जपासून ते सेक्सपर्यंत सगळ्याच मुद्यावर बोलते. मी आणि अक्षयने प्रत्येक मुद्यांवर मुलांशी खुलेपणाने चर्चा केली आहे. समलैगिकता, ड्रग्ज, दारू, सेक्स अशा सगळ्याचं विषयावर मी मुलांशी बोलते. 

ट्विंकल खन्ना सध्या अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेसाठी निर्मात्याची धुरा सांभाळते आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. महिलांची मासिक पाळी आणि त्याच्याशी निगडीत अनेक समस्यांचं समाधान करणाऱ्या व्यक्तीची कहाणी या सिनेमातून दाखविली जाणार आहे.