अल्लादिनची चाची (गुलफान खान) यांना अल्लादिनच्या खूप काळ लपवून ठेवलेल्या `काळा चोर’ या सिक्रेटबद्दल कळते आणि त्यानंतर ती अल्लादिनला ब्लॅकमेल करायला लागते, आपल्या बुद्दू नवऱ्यासाठी मुस्तफासाठी (बद्रुल इसलाम) आणि स्वतःसाठी काम करायला भाग पाडते. चाची अल्लादिनला अम्मीने दिलेली बांगडी त्याच्याच खोलीत लपवायला सांगते आणि दुसऱ्या दिवशी मात्र अम्मी (स्मिता बंसल)ने दिलेली बांगडी सापडत नसल्याचा कांगावा करते व मुस्तफाला ती अल्लादिनच्या खोलीत शोधायला पाठवते. अम्मीलाही अल्लादिन चोर असल्याचा संशय येतो आणि ती त्याच्याशी बोलणं बंद करते.
याच काळात जाफर राजकुमारी जास्मिनने (अवनीत कौर)ने त्याच्याशी लग्न करावे म्हणून अतिशय प्रयत्न करत असतो, राजवाड्यात खोटा राजा आणतो आणि त्याला लग्न करण्याचा आदेश देण्याबद्दल सांगतो. शिवाय तो झैनला (कुणाल खोसला)ला यास्मिनला मिळवण्यासाठी मदत करायला सांगतो.
एकीकडे अल्लादिनला त्याची दुहेरी ओळख लपवण्याची कसरत करावी लागते आहे आणि दुसरीकडे राजकुमारी यास्मिनला तिच्या वडिलांनी राजा म्हणून लग्न करण्याचे फर्मान सोडले आहे.अम्मी अल्लादिनवर पुन्हा विश्वास ठेवेल का आणि त्याच्याशी पुन्हा बोलायला लागेल का? जाफरचा हेतू साध्य होईल का?
मालिकेतील भागात येणाऱ्या थराराबद्दल, यास्मिनची भूमिका साकारणारी अवनीत कौर म्हणाली की, ``मालिकेमध्ये एकाच वेळेला अनेक घटना घडत आहेत, यामुळे मालिका अतिशय आकर्षक होते आहे. अल्लादिन आणि यास्मिन सतत एकमेकांच्या वाटेत येत आहेत. जाफर अधिकाधिक प्रबळ होत आहे आणि त्याला यास्मिनला स्वतःच्या आय़ुष्यात आणायचंच आहे. प्रेक्षकांना हा ट्रॅक पाहायला नक्कीच आवडेल.’’
स्क्रीनवर अल्लादिनची भूमिका साकारणारे सिद्धार्थ निगम म्हणाले की, ``अल्लादिन म्हणजे नेहमीच संकटाना आमंत्रण देणारा मुलगा आहे, त्याचे चाचा आणि चाची काळा चोरबद्दल कळल्याने त्याला ब्लॅकमेल करतात. यास्मिनला अद्याप तो चांगला माणूस असल्याची खात्री वाटत नाहीये. अम्मीलासुद्धा आपल्या लेकावर अतिशय प्रेम आणि आदर आहे, पण तिनेही त्याच्याशी बोलणं बंद केलंय. अल्लादिन या सगळ्या अडचणींवर मात करू शकेल का आणि विजय प्राप्त करूशकेल का.’’