Join us

राघवच्या रिअल लाइफ आनंदी अन् चिंगीला पाहिलं का? पाहा अभिनेत्याचा फॅमिली व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 10:53 IST

Naava gadi nava rajya: सध्या सोशल मीडियावर राघवच्या रिअल लाइफ आनंदीची आणि चिंगीची चर्चा रंगली आहे.

झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' (naava gadi nava rajya) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यामध्येच सध्या सोशल मीडियावर राघवच्या रिअल लाइफ आनंदीची आणि चिंगीची चर्चा रंगली आहे.

नवा गडी नवं राज्य या मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर (kashyap parulekar) याने राघवची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.  कश्यप सोशल मीडियावर सक्रीय असून कायम मालिकेच्या सेटवरील फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या रिअल लाइफ आनंदीसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कश्यपने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत दिसून येत आहे.  कश्यप त्याच्या कुटुंबासोबत गोव्याला व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. यावेळी व्हेकेशन एन्जॉय करतानाचा त्याने व्हिडीओ शेअर केला आहे.

कश्यप परुळेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेपूर्वी त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’  या मालिकेत त्याने नेताजी पालकर यांची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीपल्लवी पाटील