Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलोकनाथचं होतं 'सुनबाई'सोबत अफेअर;संस्कारी बाबूजींवर झाला होता बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 11:40 IST

Alok nath: कलाविश्वात नाव कमावणाऱ्या आलोक नाथ यांच्यावर कलाविश्वातील अनेक स्त्रियांनी #MeTooचे आरोप केले.

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी अशी ओळख मिळवणारे प्रसिद्ध अभिनेता म्हणजे आलोक नाथ (Alok Nath). आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आदर्श वडिलांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र, पडद्यावर सरळ, साध्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचं आयुष्य प्रचंड वादग्रस्त राहिल्याचं पाहायला मिळतं. कलाविश्वात नाव कमावणाऱ्या आलोक नाथ यांच्यावर कलाविश्वातील अनेक स्त्रियांनी #MeTooचे आरोप केले. इतकंच नाही तर पडद्यावर त्याच्या सुनेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीलाही डेट केल्याचं समोर आलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे.

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आलोक नाथ यांनी वडिलांची वा आदर्श सासऱ्यांची भूमिका साकारली. अग्निपथ या चित्रपटातही त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी ४८ वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आजवर त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. मात्र, कलाविश्वातील स्त्रियांनी त्यांच्यावर #MeToo या मोहिमेअंतर्गत गेलेल्या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला. यात त्यांचे अनेक अफेअर्सदेखील समोर आले.

नीना गुप्ताला केलंय डेट?

80 च्या काळात नीना गुप्ता (Neena Gupta) आणि आलोक नाथ (Alok Nath) यांच्या अफेअरची मोठी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे 'बुनियाद' या मालिकेत नीना यांनी आलोक नाथ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या दरम्यान, दोघांमधील जवळीकता वाढली आणि ते एकमेकांना डेट करु लागले. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही.

दरम्यान, २०१८ मध्ये अनेक महिलांनी त्यांच्यावर असभ्य वर्तन आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. निर्मात्या विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती.

टॅग्स :आलोकनाथनीना गुप्ताबॉलिवूडसेलिब्रिटी