Join us

देवा! अभिनेत्रीनं डस्टबिनमधली ड्रिंक काढली अन् पोटात रिचवली, काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:29 IST

Smriti Khanna : अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. अर्थात या व्हायरल व्हिडीओमागची कहाणी वेगळीच आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना...! एका अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत ही अभिनेत्री कचराकुंडीतील कॅन काढून त्यातलं ड्रिंक पिताना दिसतेय. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. अर्थात या व्हायरल व्हिडीओमागची कहाणी वेगळीच आहे.

डस्टनिमधील कॅन उचलून त्यातलं ड्रिंक पिणारी अभिनेत्री आहे स्मृती खन्ना ( Smriti Khanna ). ‘मेरी आशिकी तुमसे’ या मालिकेत तुम्ही तिला पाहिलं असेल. स्मृतीचा हा व्हिडीओ अन्य कुणी नाही तर तिचा नवरा गौरव गुप्ताने शेअर केला आहे. ‘हिचं स्वच्छ भारत अभियान,’ असं लिहित गौरवने स्मृतीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. गौरवने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला.

अभिनेत्री कचराकुंडीतील ड्रिंक काढून पित असलेली पाहून चाहते हैराण झालेत. ही तर हद्दच झाली, अशा काय काय प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्यात. पण आता या व्हिडीओमागची खरी कहाणी समोर आली आहे.होय, खुद्द स्मृतीने या व्हिडीओ मागचं रहस्य उघड केलं. ते काय तर गौतमने हा व्हिडीओ रिव्हर्स मोडमध्ये शेअर केला आहे. होय, म्हणजे स्मृती आधी ड्रिंक प्यायली आणि नंतर तिने रिकामी कॅन डस्टबिनमध्ये टाकली. पण गौतमने याचा रिव्हर्स व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे स्मृती डस्टबिनमधून कॅन काढून ड्रिंक पित असल्याचं दिसतंय.

‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेत स्मृती व गौरव एकत्र दिसले होते. गेल्याच वर्षी स्मृती आई बनली. हे कपल सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आपले मजेशीर व्हिडीओ ते सतत शेअर करत असतात. स्मृतीने इट्स कॉम्प्लिकेटेड, बालिका वधू, कसम तेरे प्यार की, इस प्यार को क्या नाम दूं अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार