Join us

हिंदी गाण्यावर मास्तरीणबाईंचा मराठमोळा साज; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 14:03 IST

Shivani rangole: साधेपणाने मास्तरीणबाईंनी जिंकली नेटकऱ्यांची मन; प्रितमच्या गाण्यावर शेअर केला व्हिडीओ

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या झी मराठीवर चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील मास्तरीणबाई आणि अधिपती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावतीये. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे, अक्षरा ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचीच चर्चा रंगत आहे. शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते. यामध्येच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.

शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवरच चाहत्यांची भेट घेत असते. यात तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी नेसली असून छान मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला आहे.

शिवानीने  प्रितम यांच्या Bheegi Si Bhaagi Si  या गाण्यावर रील केलं आहे. शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :शिवानी रांगोळेटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबॉलिवूड