Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने २२व्या वर्षी खरेदी केली BMW कार, ५० लाखांच्या घरात आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:09 IST

२२ वर्षीय अभिनेत्रीने आलिशान आणि महागडी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन याचे फोटो अभिनेत्रीने शेअर करत चाहत्यांना याबाबत अपडेट दिली आहे. 

'तुझसे है राबता', 'फना : इश्क मे मरजावा' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री रीम शेख घराघरात पोहोचली. रीम लाफ्टर शेफमध्येही दिसली होती. सध्या लाफ्टर शेफ २मधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. रीम सोशल मीडियारही प्रचंड सक्रिय असते. नुकतंच तिने आलिशान आणि महागडी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन याचे फोटो अभिनेत्रीने शेअर करत चाहत्यांना याबाबत अपडेट दिली आहे. 

रीमने सर्वात महागडी आणि ब्रँडेड मानल्या जाणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या BMW कंपनीची नवी कोरी कार खरेदी केली आहे. "अल्लाह हा शुकर", असं म्हणत तिने नव्या गाडीचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. रीमने बीएमडब्ल्यू एक्स १ ही लक्झरी कार खरेदी केली आहे.  अभिनेत्रीने खरेदी केलेल्या या बीएमडब्ल्यू कारची किंमत सुमारे ५० लाखांच्या घरात आहे. 

रीमने २२व्या वर्षी ही लक्झरी कार खरेदी केली आहे. रीम हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. बालकलाकार असल्यापासूनच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. 'तुझसे है राबता' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही ती दिसली आहे. 'फना : इश्क मे मरजावा', 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकांमध्येही ती झळकली आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारबीएमडब्ल्यू