Join us
Daily Top 2Weekly Top 5

Madhuri Pawar : ‘तुझ्यात जीव रंगला’मधील वहिनीसाहेबांचं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:03 IST

Madhuri Pawar : माधुरी पवार सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. होय, माधुरी पवारचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत...

चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करते व्याजा सकट, असा सणसणीत डायलॉग मारणारी ‘देवमाणूस’मधील चंदा असो वा ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jiv Rangla) या मालिकेतील  ठसकेबाज वहिनीसाहेब किंवा मग ‘रानबाजार’मधील करारी प्रेरणा पाटील.... तिने सगळ्या भूमिकेत अगदी जीव ओतला. आम्ही बोलतोय ते मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्याबद्दल. सध्या माधुरी एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. होय, माधुरी पवारचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

माधुरीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि तिच्या या  फोटोंची तुफान चर्चा होत आहे. माधुरीने काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये  पाण्यात बोल्ड पोझ दिल्या आहेत. तिचे हे इतकं बोल्ड फोटोशूट पाहून चाहतेही क्रेझी झाले आहेत.

 माधुरी पवार ही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली होती.  या मालिकेत तिने नंदिता वहिनींची भूमिका साकारली होती. आधी ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. पण तिने मालिकेला रामराम ठोकल्यावर माधुरीने नंदिता वहिनीच्या भूमिकेत मालिकेत दमदार एंट्री घेतली होती.

धनश्री काडगावकरने मालिकेला गुडबाय म्हटल्याने ही भूमिका माधुरीकडे आली होती. या पात्राचं वेगळेपण जपत माधुरीने ही भूमिका अशी काही साकारली की तिचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. यानंतर ‘देवमाणूस’ या मालिकेत ती चंदाच्या भूमिकेत दिसली होती. ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही तिची मालिका देखील चांगलीच गाजली होती.

‘रानबाजार’ या वेब सीरिजमधून ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. या सीरिजमध्ये तिने प्रेरणा पाटीलची भूमिका साकारली होती. तिच्या सीरिजमधील लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या भूमिकेसाठी तिने चक्क टक्कल केलं होतं. इतकं नव्हे तर या भूमिकेसाठी अक्षरश: शिव्या देण्याची प्रॅक्टिसही तिने केली होती.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलामराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार